अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षक शालेय कामकाज सांभाळून ३४ वेगवेगळया प्रकारची शासनाच्या कामांमध्ये मदत करत असतात. त्यात सार्वत्रिक निवडणूकीची कामे ही सक्तीची व तेवढ्याच जबाबदारीची असतात. निवडणूक झाल्यानंतर मानधन मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना लवकर दिले जात नाही. मागील महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे मानधन त्वरित मिळावे या मागणीचे निवेदन अमळनेर तालुका जुक्टो संघटनेने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना दिले.
निवेदन देताना अमळनेर तालुका जुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. डी. व्ही.भलकार ,उपाध्यक्ष प्रा. बि.आर.गुलाले, सचिव प्रा.जी.एल.धनगर ,प्रसिद्धी प्रमुख प्रा.किरण पाटील, प्रा. सी. बी. सूर्यवंशी, प्रा. बी.आर. संदानशिव , प्रा. व्ही. एस पाटील, प्रा. डी. एन वानखेडे, प्रा. डी. के तायडे, प्रा. योगेश वाणी, प्रा. शेलकर व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.