धरणगाव (प्रतिनिधी) भाजपचे युवानेते चंदनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेविका संगीता मराठे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब मराठे आणि भाजपच्या वतीने शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाजपचे युवानेते चंदनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २७ मार्च रोजी आयोजित केलेल्या शिबिरात नाक-कान घसा, दंतरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, जनरल तपासणी, नेत्ररोग तपासणी, स्त्रीरोग तपासणीसह सर्व आजारांसंदर्भात तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या शिबीरास डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचे सहकार्य लाभणार आहे.
या शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांवर महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार करण्यात येतील. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ९४२०१०७४९२ (गुलाब मराठे) या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. या शिबिरात उच्चशिक्षित तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स व संबंधित स्टाफ उपस्थित राहणार आहेत.या शिबिराचे आयोजन मराठे गल्लीतील बजरंग चौकमधील श्री.जी. हॉस्पिटलमध्ये करण्यात आले असून सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत रुग्णांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे.