नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चारा घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सकाळी सकाळीच सीबीआयच्या टीमने त्यांच्या निवासस्थानासह १५ ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली आहे. एक टीम राबडी देवींच्या सरकारी निवासस्थानीदेखील पोहोचली आहे.
राबडीदेवींच्या घरी आलेल्या टीममध्ये महिला आणि पुरुष अधिकारी आहेत. या टीममध्ये १० अधिकारी आहेत. राबडींच्या घरी कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सीबीआयची टीम इथे कशासाठी आलीय याची माहिती दिली जात नाहीय. तरी देखील सूत्रांनी रेल्वे भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने छापे टाकल्याचे सांगितले आहे. लालू प्रसाद जेव्हा रेल्वेमंत्री होते तेव्हाचे प्रकरण आहे, अद्याप यावर अधिकृत खुलासा झालेला नाही.
दरम्यान, सीबीआयने आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. लालू यांच्या या नव्या प्रकरणी दिल्ली ते बिहार असे एकूण १७ ठिकाणी छापेमारी सुरु आहे.