जळगाव (प्रतिनिधी) खानदेशातील सांस्कृतिक मानदंड ठरलेला बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या एकोणिसाव्या पुष्पाचे आज छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात शानदार उद्घाटन झाले.
जळगाव शहराच्या प्रथम नागरिक भारती सोनवणे यांच्या समवत भारतीय स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक मुकेश सिंग, रिजनल मॅनेजर विक्रांत नेगी, बँक ऑफ महाराष्ट्राचे जुन्नर मॅनेजर राजेश देशमुख, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक मनोज कुमार, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, यांच्या शुभहस्ते व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदुरकर, दीपिका चांदुरकर, अरविंद देशपांडे व प्राध्यापक शरदचंद्र छापेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या एकोणिसाव्या बालगंधर्व संगीत महोत्सवात नववर्ष दिनी मुंबईच्या शरयू दाते यांच्या शास्त्रीय तसेच नाट्यगीत व बोलावा विठ्ठल या किशोरिताई अमोनकर यांनी अजरामर केलेल्या अभंग सादर केला तसेच त्यांनी सुरुवातीला विलंबित तीन ताल आली रे फलक लागी त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांची बंदिश मोरा मन बस कर लिनो शाम. तसेच सजनबिना ना लागे जिया मोरा हे मिरा बाई चे मिलिंद कुलकर्णी यांनी रचीत भजन सादर केले. तबल्यावर चारुदत्त फडके तर संवादिनी वर मिलिंद कुलकर्णी यांनी साथ केली.
दुसऱ्या सत्रात, सुप्रसिद्ध बासरी वादक आश्विन श्रीनिवासन यांनी मेहिफिलित बाहेर आणली. त्यांनी राग जिंजोटी मध्ये विलंबित खायल बंदिश वा तरणा सादर केला. त्यानंतर नाट्य संगीत घेई छंद मकरंद सादर केले व तसेच रसिकांची व्हा व्हा मिळवली. कार्यक्रमाचा शेवटी संजोय दास यांचा सोबत गिटार व बासरीचे फ्युजन सादर केले