TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपरिषदेची हरित क्रांती – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रोपवाटिका व बीज संकलन केंद्राचे उद्घाटन

धरणगाव नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम; पर्यावरण संवर्धनासाठी १५ हजार रोपांची तयारी

vijay waghmare by vijay waghmare
July 27, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेतून ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या रोपवाटिका व बीज संकलन केंद्राचे उद्घाटन आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या रोपवाटिकेची एकूण २० हजार रोपांची क्षमता असून, यामध्ये निंब (४ हजार), चिंच (१.५ हजार), बांबू (१.५ हजार), करंज (२.५ हजार), जांभूळ (२ हजार), आंबा (२ हजार), गुलमोहर (५००), पापडी (२ हजार) अशा एकूण १५ हजार रोपांची यशस्वी निर्मिती करण्यात आली आहे. ही सर्व रोपे येत्या पावसाळ्यात नागरिकांना वृक्षारोपणासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

याच ठिकाणी बीज संकलन केंद्र देखील कार्यान्वित करण्यात आले असून, शहरातील विविध भागांतून संकलित केलेले आंबा, चिंच, जांभूळ, करंज, निंब आदींच्या बिया येथे साठवून त्यांचे जतन व संवर्धन केले जात आहे. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या घरात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या बीया नगरपरिषदेच्या संकलन केंद्रात आणून द्याव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात चुडामण मराठे यांचा रोपवाटिका उभारणीत विशेष योगदान दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी “एक लहान नगरपरिषद स्वतःची रोपवाटिका आणि बीज संकलन केंद्र सुरू करते, यापेक्षा मोठे यश नाही. हे धरणगावचे ‘हरित यश’ आहे. ही फक्त सुरुवात असून, यासाठी नागरिक आणि विद्यार्थी यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे,” असे भावनिक प्रतिपादन केले.

धरणगाव नगरपरिषदेचा हा उपक्रम इतर लहान नगरपरिषदांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. यामुळे शहराच्या हरित पट्ट्याचे प्रमाण वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही नवी दिशा मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याधिकारी श्री. झंवर यांनी केले. याप्रसंगी नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, स्थानिक नगरसेवक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanGreen Revolution of Dharangaon Municipal Council – Nursery and Seed Collection Center inaugurated by Guardian Minister Gulabrao Patil

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
Next Post

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 27 जुलै ते 02 ऑगस्ट 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

*भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप*

September 15, 2024

ब्रेकिंग न्यूज : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ; फडणवीस यांनी केली घोषणा !

June 30, 2022

मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी ; आ.चंद्रकांत पाटील नियोजनाकडे लक्ष ठेऊन !

September 19, 2022

…तर जेडीसीसीची अवस्था बीएचआर सारखी होईल…!

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group