नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांमध्ये देशभरात १८ हजार १७७ नवे करोनाबाधित आढळले व २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजार ९२३ जण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील रोज वाढत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २ जानेवारीपर्यंत १७,४८,९९,७८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ९ लाख ५८ हजार १२५ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरकडून ही माहिती मिळालेली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख २३ हजार ९६५ वर पोहचली आहे. तर, सध्या देशात २ लाख ४७ हजार २२० अॅक्टिव्ह केसेस असून, ९९ लाख २७ हजार ३१० जण आतापर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय कोरोनामुळे देशात आजपर्यंत १ लाख ४९ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.