पातोंडा ((प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा संत शिरोमनी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संत शिरोमनी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमित्त पातोंडा येथे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
“निदंक हा घाणा म्हणावा तो जरी शुभ कार्या आधिं भरतात, लग्नी भरीयला घाणा म्हणवेना कोणा निंदक तो, संतु म्हणे म्या तो घाणा भरियला सिध्दीस तो नेला पांडुरंगे, असे आपल्या अभंगातुन संदेश देणारे प्रस्थापित अन्यायाविरुद्ध लढा देणारे, संत तुकाराम यांना साथ देऊन तुकोबांची गाथा लिहून आणि जपून तब्बल १६ वर्षे तुकोबांसोबत राहणारे तुकोबांना आधार देणारे संत शिरोमनी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमित्त पातोंडा येथे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज बांधव सुधाम चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी चूडामन चौधरी, राजेंद्र चौधरी, भगवान चौधरी, विजय चौधरी, अमोल चौधरी, मनोहर चौधरी, राहुल चौधरी, विलास चौधरी, अनिल चौधरी, राहुल महाले, रघुनाथ लोहार, अशोक महाजन, विवेक चौधरी, नितु कोळी व कुंदन बागुल आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.