TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2023
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, शाळा समन्वयक अश्विनी पाटील, दिप्ती पाटील, सुचिता पाटील, किर्ती चौधरी, जगदीश पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांनी शिक्षक, समाजसुधारक, क्रांतिकारक, पत्रकार, लेखक अशा विविध भूमिकांमधून जनजागृती केली. टिळकांच्या जीवनातील विविध प्रसंगांविषयी शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच शाळेतील शिक्षिका वैशाली गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झालेले तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठेंची साहित्यिक कारकीर्द, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान, त्यांच्या बालपणाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.

READ ALSO

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

टिळकांच्या बालपणापासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या विविध प्रसंगांचे सादरीकरण आपल्या वक्तृत्वातून करून विद्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. वक्तृत्व स्पर्धा तीन गटात विभागण्यात आली होती. इयत्ता ३ री आणि ४ थीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे बालपण व टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव- शिवजयंती या विषयांवर वक्तृत्व सादर केले. इयत्ता ५ वी आणि ६ वीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे ग्रंथ प्रेम आणि लोकमान्य टिळकांच्या चरित्रातील प्रेरणादायी घटना या विषयांवर वक्तृत्व सादर केले.

इयत्ता ७वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांनी टिळक : भारतीय असंतोषाचे जनक आणि लोकमान्य टिळकांचे शेतीविषयक विचार या विषयांवर वक्तृत्व सादर केले. इयत्ता ३ री आणि ४ थीच्या गटात हर्षाली किरण पाटील, जयेश गिरीश महाजन, विशाखा प्रमोद पाटील आणि शौर्य शिरीष ठाकरे हे विद्यार्थी विजयी झाले. इयत्ता ५ वी आणि ६ वीच्या गटात जय गजानन पाटील, आराध्या चंद्रशेखर वानखेडे, कुशल चंद्रकांत देवरे आणि अन्वी सुधीर पाटील हे विद्यार्थी विजयी झाले. इयत्ता ७वी आणि ८वीच्या गटात दक्ष प्रवीण जैस्वाल,आर्या मनोहर सोनवणे आणि भावेश प्रवीण बागुल हे विद्यार्थी विजयी झाले. स्पर्धेचे परीक्षण अमन पटेल, अश्विनी पाटील, जयश्री सूर्यवंशी आणि कीर्ती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचशिला वाघ यांनी केले. शाळेतील कलाशिक्षक देवेंद्र बारी यांनी उत्कृष्ट फलक रेखाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
Next Post

वैजापुरात दरोडेखोरांचा धुमाकूळ ; दाम्पत्याला जबर मारहाण करत लांबवले दागिने आणि रोकड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज कुंद्रा प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

July 25, 2021

ओटीपी विचारून मुक्ताईनगरच्या एकाची ९९ हजारात ऑनलाईन फसवणूक ; सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 5, 2022

चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा !

November 16, 2024

बोदवड तालुक्यातील मनूर खुर्द येथील पुलाचे काम रखडले ; ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांचे हाल !

September 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group