धरणगाव (प्रतिनिधी) येथील तिळवण तेली समाज सुभाष दरवाजा विभाग यांच्यातर्फे श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यासाठी व महाआरतीचा कार्यक्रम दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता.
प्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन धरणगाव येथील विवेकानंद नागरिक पतपेढीचे चेअरमन व जय गुरुदेव माध्यमिक विद्यालय चेअरमन अॅड. व्ही.एस. भोलाणे व माजी नगरसेविका चंद्रकला वसंतराव भोलाणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धरणगाव येथील निवृत्त मुख्याध्यापक प्राध्यापक बी.एन.चौधरी यांनी महाराजांविषयी सर्व माहिती सांगितली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायत्री परिवाराचे कैलास नाना चौधरी तसेच शहराध्यक्ष रतिलाल नाना चौधरी, आत्माराम चौधरी, निवृत्त समाज कल्याण अधीक्षक शालिग्राम भोलाणे आणि कृषी खात्यातून निवृत्त झालेले अशोक व्यवहारे, ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक भरतभाऊ चौधरी, लालचंद चौधरी, श्रावण चौधरी, रमेश भोलाणे, नगरपालिकेतून निवृत्त झालेले संतोष चौधरी, पंढरीनाथ चौधरी, डोंगर चौधरी, किशोर भामरे, छोटूभाऊ चौधरी, अनिल आधार चौधरी, काशिनाथ चौधरी, दिलीप चौधरी, अशोक जयराम चौधरी, अवधूत चौधरी, भैय्या गुलाब चौधरी, रवींद्र चौधरी यांच्यासह महिला भगिनी सुद्धा फार मोठ्या संख्येने श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करण्यासाठी व महाआरतीसाठी हजर होत्या. महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत असताना सर्व तेली समाजाच्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात संताजी महाराजांच्या बाबतच्या घोषणा दिल्या. त्यानंतर नाश्ता व चहाचे आयोजन धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम चौधरी यांच्यातर्फे करण्यात आले होते.