अमळनेर (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर शाखेच्या वतीने पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त माजी आमदार कृषिभूषन साहेबराव पाटिल व लोकनियुक्त नागराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटिल यांच्या हस्ते बाळशास्त्रीजींचे प्रतिमापूजन व माल्यार्पण करत पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार कृषिभूषण पाटिल यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, नगर पालिकेच्या माध्यमातून पत्रकार भवनाला जागा मिळवून दिली तसेच श्री संत प्रसाद महाराज यांनी ५१ हजार व मी देखील १ लाख रुपये दिले व लोकनियुक्त नगराध्यक्षा याच्या १ महिन्याचे मानधन देखील दिले आहेत. दोन वर्षा पूर्वी जागा देण्यात आली. आज त्या ठिकाणी वॉलकम्पाउंड चे काम देखील सुरु आहे. आगामी काही वर्षात भव्य पत्रकार भवन उभारू, तसेच पत्रकार भवनाला काहीही गरज व अडचण भासल्यास मि सदैव कटिबद्ध राहिल असे आपल्या मनोगतातून ते बोलले
यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, मा.आ. स्मिताताई वाघ, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, संदीप गायकवाड, संजय चौधरी, गोकुळ बोरसे, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, हरि भिका वाणी, तहसीलदार मिलींदकुमार वाघ, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक डिगंबर महाले, सल्लागार विवेक आहिरराव, पांडुरंग पाटिल, उमेश धनराळे, जयश्री दाभाड़े, तालुकाध्यक्ष चंद्रकांत काटे, सचिव भटेश्वर वाणी, उपाध्यक्ष विजय गाढे, उपाध्यक्ष मिलिंद पाटिल, सहसचिव जितेंद्र पाटिल, खजिनदार ईश्वर महाजन, संघटक गौतम बिऱ्हाडे, सचिन चव्हाण, भरत पवार, आर.जे.पाटील, राहुल पाटिल, योगेश महाजन, समाधान मैराळे, संजय मरसाळे, भूपेंद्र पाटिल, हिरालाल पाटिल, बेणेश्वर पाटिल, दिनेश पालवे, सुनील करंदीकर, विनोद कदम, संजय सूर्यवंशी, दिनेश नाईक, नूरखान पठाण, युवराज पाटील, गुरुणामल बठेजा, सुखदेव ठाकूर, सुरेश काबळे, अजय भामरे, पंडित चौधरी, जयंतीलाल वानखेड़े, रवि मोरे, नगरसेवक श्याम पाटिल, मनोज पाटिल, माजी नगरसेवक विक्रांत पाटिल, महेश पाटिल, अंकिता पाटील, सुरेश पाटिल, साखरलाल महाजन, सचिन पाटिल, माधुरी पाटिल, श्रीकांत पाटिल, सुनिल शिंपी, सनी गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डिगंबर महाले यांनी केले. तर आभार आर.जे.पाटील यांनी मानले.