जळगांव (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत आज सकाळी ११ वाजता ‘समूह राष्ट्रगीत गायन’ जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे तसेच तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे, महेंद्र माळी, प्रशांत कुलकर्णी तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
















