जळगाव : पातरखेडा येथील पोलिस स्कॉड मधील हवलदार प्रवीण सोनवणे यांच्या कुटुंबीयांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी ते कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले आणि त्यांनी कुटुंबियांना आधार दिला.
कोणत्याही मंत्र्यांचे पोलिस स्कॉड हे सुरक्षा कवच असते. त्यातील पोलिस बांधव हे कुटुंबातील घटक मानणारे जिल्ह्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस स्कॉडमधील हवलदार प्रवीण सोनवणे यांच्या वडिल- प्रताप सोनवणे (विद्यमान सरपंच, सेवानिवृत्ती कर्मचारी) निधन झाल्याचे कळताच पातरखेडा येथे जावून सांत्वनपर भेट दिली. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला, त्यांच्या दुःखात सहभागी झाले.