जळगाव (प्रतिनिधी) अगदी धडधाकट व्यक्तींनाही आयुष्यात खूप अडचणी येत असतात, तर दिव्यांगांच्या समस्या या यापेक्षा खूप भयंकर असतात. आपण जर सर्वांना मदत करू शकतो तर, दिव्यांगांना मदत करणे ही परमेश्वरी सेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी केले. ना. गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार पटेल लेवा भवनात आयोजीत कार्यक्रमात दिव्यांगांना साहित्य वाटप करण्याच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील ७६ दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेची मंजुरीपत्रे प्रदान करण्यात आली. तर आपण दिव्यागांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
याबाबत वृत्त असे की, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांना आज साहित्य वाटप करण्यात आले. याआधी तपासणीतून निवडलेल्या दिव्यांगांना तीन चाकी सायकल, चेअर, एलबो स्टीक, व्हिल चेअर, कर्णयंत्र, अंधकाठी, वॉकींग स्टीक, वॉकर आदी साहित्याचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे ,तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर , पंचायत समितीचे सभापती ललिताताई पाटील , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी , जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती उपसभापती संगीताताई चिंचोरे , पंचायत समितीचे शिवसेना, महिला आघाडी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप करण्यात आले. यानंतर तालुक्यातील ७६ दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठीची मंजुरीपत्रे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, दिव्यांगांना आयुष्यात खूप अडचणी असतात. तथापि, त्यांनी मनात कोणताही न्यूनगंड बाळगता कामा नये. राज्य शासनाने त्यांच्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या असून याची यशस्वी अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून पाच टक्के रक्कम ही दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. कुठे या प्रकारचा निधी दिव्यांगांसाठी वापरला जात नसले तरी याची आपल्याकडे तक्रार करावी. याबाबत संबंधीतांवर नक्की कारवाई होईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. अनेक दिव्यांग व्यक्ती हे लहान-सहान कामे करून स्वाभीमानाने आयुष्य जगत आहेत. त्यांच्या स्वयंरोजगारासाठी तीन चाकी वाहने देण्याचा मानस देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांच्या उत्थानासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून आपण देखील सातत्याने कामांचा ध्यास घेतला आहे. दिव्यांग व्यक्ती हे समाजातील उपेक्षित घटक आहेत. मात्र त्यांना देखील विकासाच्या पूर्ण संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा निर्धार असून भविष्यातही दिव्यांगांच्या मदतीसाठी आपण कटीबध्द असल्याचे अभिवचन याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे , जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक एस. पी. गणेशकर , तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , पंचायत समिती सभापती पती जनाआप्पा पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष रमेश आप्पा पाटील, महानगरप्रमुख शरदआबा तायडे, नगरसेवक गणेश सोनवणे, शाम कोटा, रवी चव्हाण सर, माजी सभापती नंदलाल पाटील, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, संचालक अपर्णा मकासरे महिला आघाडीच्या शोभाताई चौधरी, यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात एस पी गणेशकर यांनी सांगितले की, जळगांव ग्रामीण मतदारसंघात एकूण 245 दिव्यांग व्यक्तींना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 10 लक्ष निधी आमदार निधीतून मंजूर केला असून पहिल्या टप्यात जळगांव तालुक्यात 245 पैकी 102 व्यक्तींना साहित्य मंजूर केले आहे. सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील व मुकुंदराव गोसावी यांनी केले तर आभार संगोयो चे अध्यक्ष रमेश पाटील व मीनाक्षी निकम यांनी मानले.