TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

vijay waghmare by vijay waghmare
February 21, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी )  – जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक व महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे उपकार्यालय एरंडोल येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. काल जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम २०२६–२७ अंतर्गत आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मागणी ठामपणे मांडली होती. त्यास अनुसरून एरंडोल येथे उपकार्यालय सुरू करण्यास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मान्यता दिली आहे.*

गेल्या तीन वर्षांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत होते. या मागणीला जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार व खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधीचेही पाठबळ लाभले होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

दरम्यान, एरंडोल येथे उपकार्यालय मंजूर झाल्याच्या घोषणेनंतर आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ते पंढरीनाथ मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील शासकीय विश्रामगृहापासून निवासस्थानापर्यंत आदिवासी नृत्य करत जल्लोषात मिरवणूक काढली. त्यानंतर पालकमंत्र्यांचा धनुष्यबाण, शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी पंढरीनाथ मोरे, शिवसेना मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख तथा पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, संभाजी सोनवणे, संतोष सोनवणे, संभाजी पवार, विनोद मोरे, वासुदेव मालचे, रुपेश सोनवणे, रोहिदास सोनवणे, अशोक बागुल, भागवत मोरे, सुभाष सोनवणे, तुकाराम मोरे, दीपक सोनवणे यांच्यासह युवासेना नेते अमोल पारधी, पोखरीचे सरपंच नवल पारधी आदी उपस्थित होते.

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले की, “आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी शासन पूर्णतः कटिबद्ध आहे. आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. जेव्हा-जेव्हा आदिवासी समाजाला सहकार्य लागेल, तेव्हा मी स्वतः पुढे उभा राहीन असे सांगितले.

यावल येथील मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचणे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील आदिवासी बांधवांसाठी खर्चिक व वेळखाऊ ठरत होते. एरंडोल हे शहर भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, पारोळा व अमळनेर या तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून जळगाव रेल्वे स्थानकापासून अवघ्या ३५ किमी अंतरावर असून जळगाव ते धुळे मुख्य महामार्गावर आहे,त्यामुळे एरंडोल येथे उपकार्यालय झाल्यास हजारो आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ सुलभ व वेळेत मिळणार आहे.
त्याचबरोबर उपरोक्त 7 तालुक्यामध्ये 6 शासकीय आश्रम शाळा व 14 अनुदानित आश्रम शाळेमध्ये सुमारे 13000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना व आदिवासी पालकांनाही याचा फायदा होणार आहे

या उपकार्यालयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृह, शिष्यवृत्ती तसेच शिक्षण, आरोग्य व रोजगारविषयक योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार आहे. कागदपत्र पूर्ततेसाठी लागणारा वेळ व खर्च कमी होणार असून, मजुरी बुडणार नाही किंवा व्यवसाय-धंदा बंद ठेवण्याची वेळ येणार नाही, प्रशासन व आदिवासी लाभार्थी यांच्यात थेट संपर्क होणे सुलभ होईल, विशेष म्हणजे शासकीय इमारत उपलब्ध झाल्यास कोणताही अतिरिक्त खर्च न करता हे उपकार्यालय सुरू करता येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGuardian Minister Gulabrao Patil received a grand welcome from tribal brothers for fulfilling his promise

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

May 1, 2025

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

August 30, 2021

राज्यात महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान, धुळ्याचाही समावेश !

November 24, 2021

नशिराबादच्या अजिंक्य महिला मंडळात घडला इतिहास

October 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group