जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
ना. गुलाबराव पाटील यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. ६ फेब्रुवारी, २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी ९ वा. ४५ मि.नी. धरणगावकडे प्रयाण, सकाळी १०.०० वाजता धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे मानसिक रोग निदान कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ११ वा. धरणगाव येथे पिकेल ते विकेल या कृषी खात्याच्या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – शिवाजी पुतळा, धरणगाव. सकाळी ११ वा ३० मि.नी धरणगाव तहसिल कार्यालयात कुटूंब अर्थसहाय योजना चेक वाटप व शेतकरी आत्महत्या चेक वाटप कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – तहसिल कार्यालय धरणगाव. दुपारी १२.०० वाजता धरणगाव येथे धरणगाव नगरपालिका आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ – न. पा. गांधी उद्यान, धरणगाव. दुपारी १.०० वाजता धरणगाव पंचायत समिती आयोजित बचतगटाच्या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – जीएस लॉन, धरणगाव, दुपारी २ वाजाता. पाळधी, ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव.