जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.
गुरुवार, दि. १ जुलै, २०२१ रोजी रात्री ८.४८ वाजता मुंबई येथून जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन, पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. शुक्रवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता पाळधी येथे अभ्यागत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा, सकाळी १०.०० वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून नशिराबाद, ता. जळगावकडे प्रयाण. सकाळी १०.२० वाजता नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्याने नशिराबाद गावास भेट, सकाळी ११.०० वाजता नशिराबाद येथून आसोदा, ता. जळगावकडे प्रयाण. सकाळी ११.१५ वाजता आसोदा येथे आगमन व नियोजित कार्यक्रमांस भेटी, दुपारी १२.०० वाजता असोदा येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी १.०० वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून कांताई सभागृह, जळगावकडे प्रयाण व कांताई सभागृह, जळगाव येथे कै. बळीराम तोताराम सोनवणे यांच्या सर्वपक्षीय शोकसभेस उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी ४.०० वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावातील नियोजित कार्यक्रमास भेटी व उपस्थिती.