पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील टोळी येथिल पिडीत मुलीच्या कुटुंबियांना भेटून सात्वन करीत आरोपींना कठोर कारवाई करावी व कुटुंबाला तातडीने ८ लाख २५ रुपयांची तातडीने मदत करण्याचे प्रशासनाला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील यांनी आदेश दिले आहेत.
याप्रसंगी आ. चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, विभागीय अधिकारी विनय गोसावी, तालुका पोलीस निरीक्षक, तालुका प्रमुख आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, चतुर भाऊसाहेब पाटील, नगरसेवक पप्पु भावे, व बहुसंख्येने टोळी ग्रामस्थ उपस्थित होते.
असे मिळणार अर्थसाहाय्य
एकूण ८,२५,००० रु.अर्थसहाय्य देण्यात येईल. FIR व PM रिपोर्ट व इतर कागदपत्रे पोलीस विभागाकडून मिळाल्यानंतर प्रथम एकूण अर्थसहाय रक्कमेच्या ५० टक्के ४,१२,५०० रु. मंजूर होतील.चार्जशीट दाखल झाल्यावर एकूण अर्थसहाय रक्कमेच्या २५ टक्के २,०६,२५० रु.मंजूर होतील व अंतिम निकाल लागल्यानंतर एकूण अर्थसहाय रक्कमेच्या २५ टक्के २,०६,२५० रु.मंजूर होतील.