धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भामर्डी येथील शेतरस्त्याच्या समस्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ दखल घेतली असून हा शेतरस्ता मुरूम टाकून तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा शेतरस्ता पालकमंत्र्यांनी स्वखर्चून केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून रस्ता तयार करून दिल्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.
धरणगाव तालुक्यातील भामर्डी गावातील शेतरस्ता खराब असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाता येत नव्हते. याबाबत आठ ते दहा शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली आणि शेतरस्त्याची समस्या त्यांच्याकडे मांडली. गुलाबभाऊंनी लागलीच समस्येचे निराकरण करण्यास केले. आणि दुसऱ्याच दिवशी शेत रस्ता मुरूम टाकून तयार करण्यात आला आहे.
रस्त्यासाठी मुरूम टाकण्यापूर्वी जेसीबीची पूजा करण्यात आली. यावेळी प्रशांत पाटील, प्रदीप बोरसे, योगेश किसन पाटील, पुंडलिक अनिल पाटील, धनराज अर्जुन पाटील, किसन जगन पाटील आदी उपस्थिती होती.