जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जळके येथील शेतरस्त्याच्या समस्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ दखल घेतली असून हा शेतरस्ता मुरूम टाकून तयार करण्यात आला आहे. गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून तात्काळ रस्ता तयार करून दिल्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.
जळगाव तालुक्यातील जळके येथील सायरे जाणाऱ्या रस्त्यामध्ये भरपूर चिखल होता. यामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी जाता येत नव्हते. याबाबत आठ ते दहा शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली आणि शेतरस्त्याची समस्या त्यांच्याकडे मांडली. गुलाबभाऊंनी लागलीच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांना बोलावून समस्येचे निराकरण करण्यास सांगितले. पण, हा रस्ता कुठल्याही योजनेमार्फत बसत नाही, तर हा रस्ता खाजगी यंत्रणेमार्फत कसा करता येईल. यासाठी प्रतापराव पाटील यांनी मुरूम टाकण्यासाठी जेसीबी उपलब्ध करून दिला आणि दुसऱ्याच दिवशी मुरूम टाकून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. सव्वा किलोमीटरवर 35 ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आले आहेत. तसेच यासाठी गावातील अमोल बागुल यांनी विशेष सहकार्य केले.
शेतकऱ्यांनी मानले आभार !
शेतातील कामासाठी शेतकऱ्यांना पायदळ चालणे देखील कठीण झाले होते. पण, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे शेतकऱ्यांना आता शेतात जाणे सोपे झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.
रस्त्यासाठी मुरूम टाकण्यापूर्वी जेसीबीची पूजा करण्यात आली. यावेळी जळगाव दूध संघ संचालक रमेश जगन्नाथ पाटील, जळगाव ग्रामीण लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अर्जुन गजमल पाटील, जळगाव आत्मा कमिटीचे माजी अध्यक्ष पी के पाटील, विकास सोसायटीचे माजी चेअरमन धनराज पाटील, जळगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रशेखर पाटील, जळगाव तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष नारायण तात्या पाटील, जळके शिवसेना शाखाप्रमुख व विभागप्रमुख कवीश्वर पाटील यांची उपस्थिती होती.