TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोगस कॉल सेंटरवरुन ६७ आंतरराष्ट्रीय कॉल ; कोल्हेंच्या मोबाईलवरुन १८ वेळा संपर्क

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरमधून ६७तर कोल्हे यांच्या मोबाईलवरुन १८ आंतराष्ट्रीय कॉल झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आहे. तसेच अटकेतील राकेश अगारिया व आरती कोळी नामक महिलेच्या बँक खात्याला कोल्हे यांचा मोबाईल क्रमांक लिंक असल्याची माहिती तपासधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. त्यानुसार या गुन्ह्याचा तपासाकरीता कोल्हे यांना दि. ८ पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावल्यामुळे कोल्हेंचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगण्यासह वेगवेगळे अमिष दाखवून इंग्लंडसह अन्य देशांमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एल. के फार्म हाऊसवरील बोगस कॉलसेंटवर पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह सात जणांना अटक केले होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे कोल्हे यांच्यासह इतर संशयितांना हातात बेड्या घालून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

यावेळी तपासाधिकारी डीवायएसपी नितीन गणापुरे यांनी संशयितांनी फसवणुकीची पद्धत आणि तपासात उघड झालेल्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार अटकेतील संशयित ललित कोल्हे (रा. कोल्हे नगर) यांच्यासह राकेश चंदू अगारिया (रा. वाघ नगर) या दोघांची चौकशी करण्यासाठी त्यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी तपासधिकारी गणापुरे यांनी युक्तीवादातून केली. त्यावर बचाव पक्षांच्या वकिलांनी तीव्र विरोध करीत वाढीव कोठडीच्या कारणांवर आक्षेप घेतला. मात्र तपासाधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य पुन्हा न्यायालयासमोर मांडला.

पाच जणांना न्यायालयीन कोठडी
दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. एस.डी. खरे यांनी ललित कोल्हे व राकेश अगारिया यांना दि. 8 ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावली. तसेच नरेंद्र चंदू अगारीया, मोहम्मद जिशान नुरी मोहम्मद नुर आलम (वय १९), शाहबाज आलम मोहम्मद शाहबउद्दीन (वय २५), साकीब आलम शहाबरहीन (वय १९) मोहम्मद हाशिर मोहम्मद राशिद (वय १९, सर्व रा. हावडा, पश्चिम बंगाल) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

विदेशातील सहभागी असलेल्यांचा घेणार शोध
जप्त केलेल्या लॅपटॉपमधून अटकेतील संशयित इम्रान खान याने बोगस कॉल सेंटरसाठी लागणारे इंटरनेट स्वतःच्या नावाने घेतले असून त्याची केवायसी त्याच्याच नावावर आहे. तसेच लॅपटॉपमध्ये पेपल व अॅमेझॉन कस्टमर सपोर्ट या कंपन्यांचा डेटा मिळून आला आहे. त्याचप्रमाणे विदेशी नागरिकांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, बँक खात्याची माहितीसह इतर बरीच माहिती आणि विदेशी नागरिकांना फसविण्यासाठी वापरली जाणारी स्क्रिप्ट मिळून आली आहे. कॉल सेंटर चालविण्यासाठी परदेशात कुणी सहभागी आहे का याची देखील चौकशी केली जाणार आहे.

इतर साक्षीदारांचे नोंदवले जबाब
बोगस कॉल सेंटरवर इंटरनेट कनेक्शन लावणारा, पेंटर काम, फर्निचर वाला यासह या गुन्ह्यातील संशयित राकेश अगारिया व आरती रमेश कोळी या महिलेच्या बँक खात्यासोबत संशयित माजी महापौर कोल्हे हे वापरत असलेले दोघ मोबाईल क्रमांक लिंक असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तसेच यांचयासह इतर साक्षीदारांचे देखील जबाब नोंदविण्यात आले आहे.

डेटा मिळवला कोठून ?
फसवणुकीसाठी माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्या साथीदारांनी ग्राहकांचा डेटा कोठून मिळवला. त्याचा देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे. तसेच राकेश व नरेंद्र अगारिया दोघ भावांनी कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांना कोणत्या माध्यमासह कोणत्या जाहीरातीवरुन नोकरीवर ठेवले याबाबत देखील चौकशी केली जाणार आहे.

बँक खात्यांची होणार चौकशी
फसवणुकीतून मिळालेली रक्कम कशी मिळवली. तसेच हा गुन्हा क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा असून त्याची संपुर्ण माहिती राकेश अगारिया व ललित कोल्हे यांना माहिती आहे. तसेच आरती कोळी व राकेश अगारिया यांच्या बँक खात्याशी कोल्हेंचे दोघ मोबाईल क्रमांक लिंक आहे. त्यातून किती अवैध पैशांचे व्यवहार झाले असून किती रक्कम प्राप्त झाली आहे. तसेच बोगस कॉल सेंटर च्या माध्यमातुन प्राप्त होणारी रक्कम ही त्यांनी बनावट बँक खात्यात घेतली का याची देखील तपासणी केली जाणार आहे.

स्क्रिप्टनुसार तीन टप्प्यात सुरु होते गंडवण्याचे काम
विदेशी नागरिकांना गंडविण्याासाठी लॅपटॉपमधून दोन स्क्रिप्ट मिळून आल्या असून त्या संशयित आदिल सैय्यद व अकबर यांनी तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे. या स्क्रिप्टचे तीन टप्पे तयार करुन त्यावर कोण काम करीत होते. याची चौकशी केली जाणार आहे. विदेशी नागरिकांचे मिळालेल्या माहितीनुसार कोणाची किती फसवणूक झाली याबाबत चौकशी करुन ती रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. अटकेतील दोघांनी सांगितलेल्या माहितीनुसार तपासपथक मुबईला रवाना झाले. परंतु ते दोघ पोलिसांची दिशाभूल करीत असून त्यांना प्रत्यक्ष मुंबईत नेवून फरार संशयितांचा शोध घेतला जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू काश्मिरात दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

June 12, 2021

दोघांना १३ लाखांचा ऑनलाईन गंडा

January 25, 2026

हिताची कंपनीतून सोलारच्या साहित्यांची चोरी ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

September 11, 2024

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनावा यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावे : रोहिणीताई खडसे !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group