जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १०३८ अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जाची बुधवारी छाननी झाली असता प्रभाग क्रमांक १२ ब मधून तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी भाजपच्या उज्वला बेंडाळे यांच्या समोरील वैशाली पाटील आणि भारती चोपड या दोन महिलांचे अर्ज ठरले आहेत. यात भारती चोपडे यांनी अर्ज भरतांना चुकीचा भरला असून वैशाली पाटील यांनी तीन ठिकाणी अर्ज भरले होते. त्यामुळे अर्जाची छाननी करतांना त्यांनी आधी भरलेला अर्ज वैध ठरविण्यात आला असून प्रभाग १२ ब मधील अर्ज अवैध ठरल्याने उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
जळगाव महापालिकेत मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाचे विजयी खाते उघडले आहे. प्रभाग १२ ब मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने बेंडाळे यांच्यारूपाने भाजपाचा विजयी श्रीगणेशा झाला आहे. प्रभाग क्र. १२ ब ओबीसी महिला या प्रवर्गातून भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात वैशाली पाटील आणि भारती चोपडे या दोन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील वैशाली पाटील यांनी इतर दोन प्रभागात अर्ज दाखल केले आणि भारती चोपडे यांनी अर्ज भरतांना त्यात त्रुटी
ठेवल्या. त्यामुळे भारती चोपडे यांचा अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आला. तर वैशाली पाटील यांनी दाखल केलेल्या इतर दोन प्रभागापैकी दुसऱ्या प्रभागात आधी अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रभागातीमल अर्ज ग्राह्य धरीत १२ ब मधील अर्ज तांत्रिकदृष्ट्या निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुवर यांनी बाद ठरविला. त्यामुळे प्रभाग १२ व मध्ये केवळ भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चीत झाली आहे.
मतदाना आधीच गुलाल भाजपचा
जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतदाना आधीच एका जागेवर विजय मिळविला असल्याने भाजपासाठी हा शुभशकुन मानला जात आहे. आता २ डिसेंबरपर्यंत माघारीची अंतीम मुदत असून आणखी किती जागा बिनविरोध होतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
















