बोदवड (प्रतिनिधी) येथे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील हे होते.
यावेळी विचार पिठावर बोदवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल अध्यक्ष म्हणून उपस्थित होते संस्था सचिव विकास कोटेच्या संस्था उपाध्यक्ष अजय बरडीया, मुख्याध्यापक पी. एम. पाटील डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष ए एन काजळे ,अनंत वाघ, निवृत्ती ढोले, संजय पाटील, डॉ आतिश चौधरी , प्रा व्हि पी चौधरी उपस्थित होते यावेळी रवींद्र पाटील यांनी व रोहिणी खडसे यांनी मार्गदर्शन केले यावेळी क्रीडा शिक्षक संजय निकम , माळी , खडसे, सर श्रीमती चि. स. महाजन विद्यालय जामठी चे शिक्षक नितीन चौधरी सुनील घडेकर गणेश पाटील व शिक्षकांनी सहकार्य केले छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष शैलेश वराडे गणेश सोनवणे गणेश मुलांडे दीपक खराटे राजेंद्र वराडे भागवत धामोडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.