TheClearNews.Com
Sunday, November 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन आवश्यक उपाययोजना तातडीने करा : खासदार रक्षा खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिलेत. येथील जिल्हा नियोजन भवनात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदि उपस्थित होते.

READ ALSO

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

खासदार श्रीमती खडसे पुढे म्हणाल्या की, सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सुचनाफलक ठिकठिकाणी लावावे. ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांची माहिती तातडीने संकलीत करुन तेथे आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. घोडसगाव येथे सर्व्हिसरोड तयार करण्याच्या सुचना देऊन महामार्गाच्या कामांची गती वाढविण्याचेही निर्देश दिलेत. बहुतांश अपघात हे वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याचे गांर्भीर्य लक्षात न घेतल्याने होत असतात. यात दुचाकी धारकांची संख्या जास्त असल्याने दुचाकीला साईड मिरर आवश्यक करावा, यंत्रणांनी वाहतुक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यावेळी खडसे यांनी जळगाव-चिखली, जळगाव-धुळे, जळगाव-औरंगाबाद, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सद्यस्थितीचा माहिती सर्व संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली.

चाळीसगाव येथे परिवहन विभागाच्या उप कार्यालयाचा प्रस्ताव तातडीने सादर करा- पालकमंत्री

नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन चाळीसगाव येथे परिवहन विभागाचे उप कार्यालय सुरु करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा. अशा सुचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्यात. रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामांमुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे ही कामे लवकर पूर्ण होणे आवश्यक असून कामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता विभागाने घ्यावी. तसेच जे कंत्राटदार विहित कालावधीत कामे पूर्ण करणार नाही. त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. तसेच जिल्ह्यातील महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या प्रस्तावांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला. महामार्गावर प्रमुख गावांजवळ बसथांबा असावा, भविष्यातील अडचणी लक्षात घेता गिरणा नदीवरील बांभोरी पुलाला पर्यायी पुल उभारावा. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ ॲम्बुलन्स पोहोचेल याचीही काळजी घ्यावी. वाहनांची नोंदणी करतांना कोणी बोगस कागदपत्रे तर सादर करीत नाही ना, याची खात्री विभागाने करावी. रिक्षांमध्ये वाढीव प्रवाश्यांची होणारी वाहतुक अपघाताला निमंत्रण देत असल्याने त्याचीही तपासणी व्हावी. रसत्यांवर वाहनाच्या गतीबाबतचे फलक लावावे, भुसावाळ येथील रुग्णालयात ऑक्सिजन टँक, पोस्टमार्टम रुम उभारावी, रुग्णालयाला वॉलकम्पाऊंड करण्याची मागणी आमदार संजय सावकारे यांनी केली तसेच आमदार निधीतून एक ॲम्बुलन्सही देण्याची मागणी त्यांनी बैठकीत केली.

समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाहतूक नियमांचे महत्व संबंधित यंत्रणांनी सर्व नागरिकांना समजविताना नियमांचे पालन केल्याने जिवीत तसेच वित्तीय हानी टाळता येवू शकते याचे समाज प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. वाहन चालवितांना हेल्मेट, सिटबेल्टाचा वापर करण्याच्या सुचना देतांनाच महामार्गावर माहिती फलक तातडीने लावण्याच्या सुचना दिल्यात. त्याचबरोबर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागामार्फत कठोर कारवाईची मोहिम राबविण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी सांगितले.

समिती सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात तरसोद फाटा टीव्ही टॉवर, शिव कॉलनी थांबा, चिंचखेड फाटा, धुळे चाळीसगाव रस्ता या तीन ठिकाणी ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले आहे. मागीलवर्षी २०१९ मध्ये जिल्ह्यात ८३५ अपघातात ४५४ मृत्यु झाले तर ७७० व्यक्ती जखमी झाल्या असून २०२० मध्ये ७५२ अपघातात ४७१ मुत्यु झाले असून ५१४ व्यक्ती जखमी झाल्या असून मागीलवर्षीपेक्षा अपघातांची संख्या १० टक्क्‌यांनी कमी झाले असून मृत्युंची संख्या ३.५ टक्के वाढली आहे तर जखमींची संख्या ३३ टक्क्यांनी घटल्याचे सांगितले. तर वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलीस विभागाने २०२० मध्ये ८९ वाहने निलंबित केली असून ५ वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करुन प्रस्ताव परिवहन विभागास पाठविल्याची माहिती शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात पारोळा, मुक्ताईनगर, पाचोरा, अंमळनेर, रावेर आदि ठिकाणी ट्रामा केअर सेंटरचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या रस्त्यांबाबतची माहिती अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची माहिती प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा आणि धुळेचे अरविंद काळे यांनी दिली. बैठकीस परिवहन, एस.टी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे जीवनदूत पुरस्काराच्या मानकरी

अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी अनेक वेळा नागरीक बघ्याची भूमिका घेतात. त्यात अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. अशा व्यक्तींना तातडीने दवाखान्यात दाखल करुन त्यांना उपचार मिळावे, जेणेकरुन त्यांचा जीव वाचण्यास मदत होईल. यासाठी शासनाने जीवनदूत पुरस्कार देण्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यानुसार वर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तृप्ती धोडमिसे या भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून मागील महिन्यात रुजू होण्यासाठी जात असताना भडगाव येथे एक आजीचा अपघात झाला होता. धोडमिसे यांनी तातडीने त्यांना आपल्या वाहनात बसवून दवाखान्यात दाखल केले होते. शिवाय दवाखान्यात त्यांचेवर योग्य ते उपचार तातडीने मिळावेत यासाठी डॉक्टरांकडे पाठपुरावा केला होता. धोडमिसे यांनी आजींना तातडीने उपाचारासाठी दाखल करुन त्यांचा जीव वाचविल्याने त्यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार घोषित करण्यात आला. आज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत असल्याने धोडमिसे या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकल्या नाही. नंतर त्यांना हा पुरस्कार यथोचित प्रदान करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
Next Post

नांदेड येथे नदीपात्रात एक व्यक्ती बुडाल्याची भीती ; शोध सुरु !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर…टीम इंडियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह !

January 4, 2021

पारोळ्यात तमाशा मंडळातील तरुण-तरुणीची आत्महत्या ; विष पिऊन जीवन संपवलं !

February 26, 2022

महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

November 17, 2021

फडणवीसांच्या घराबाहेरील आंदोलन नाना पटोलेंनी केलं स्थगित ; म्हणाले..

February 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group