अमळनेर (प्रतिनिधी) जिजाऊ बहुउद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै २०२१ रोजी ह.भ.प श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
२६ जुलै अँड. ललिता पाटिल यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अमळनेर करांसाठी शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम संस्थेच्यावतीने आयोजित केले जातात. गेल्या दोन वर्षांपासून कोविड-१९ च्या प्रभावाने मानवी जीवन उध्वस्त झालेले आहे. कोरोनाच्या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जावे, कोरोना काळात सामाजिक बांधिलकी कश्या प्रकारे जोपासावी या वैफल्यग्रस्त काळात आपल्या जीवनाचा ‘पुनश्च हरिओम’ कशा प्रकारे करता येईल यासाठी ह.भ.प इंदुरीकर महाराज यांचे अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधन पर कीर्तनाचा आयोजन करण्यात आले आहे.
या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी सर्वानी अँड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे दुपारी २ ते ४ यावेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन ऍड.व्ही आर पाटील, महेश पाटील, हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, शाम आहिरे, प्रफुल्ल पवार, भिकेश पाटील, शितल देशमुख, शरद सोनवणे, जिजाबराव पाटील, निवास मोरे, घनश्याम पाटील, आयोजक समितीचे सदस्य व जिजाऊ बहुउद्देशिय संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.