जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलीक (वय ७०) यांचे सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जळगाव जिल्हा आणि राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे चांगलेच वर्चस्व होते. आपल्या भाषणात विविध उदाहरणे आणि शेरोशायरीने ते अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. गफ्फार मलिक यांच्या जाण्याने जळगावची मोठी हानी झाली आहे.
हाजी गफ्फार मलिक यांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे जळगावातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांना मलिक यांनी शेवटचा श्वास घेतला. गफ्फार मलिक यांच्या निधनाची वार्ता पसरताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.