कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील हाजी एनएम सय्यद उर्दू हायस्कूल च्या परिसरात अस्वच्छता पसरलेली असून घाणीचे साम्राज्य सर्वदूर पसरले आहे. याबाबत येथील शाळेचे मुख्याध्यापक नुरुद्दीन शेख यांनी येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांना लेखी तक्रार देऊन कळवले आहे. परंतु अद्यापपर्यंत ग्रामपंचायतकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
शाळेच्या मुख्य द्वारासमोर पाण्याची पाईपलाईन लीक झाल्यामुळे सर्वत्र घाण पाणी व डबके साचले आहे. त्यामुळे डास व मच्छर यांचे साम्राज्य पसरले असल्यामुळे विद्यार्थ्याच्या स्वास्थ्याला धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच शाळेच्या इमारतीच्या मागील बाजूस राहणारे लोकांनी इमारती लगत अतिक्रमण केल्याने व खड्ड्याची शौचालय बनवल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे. तसेच शिक्षकांना अध्यापन करणे जिकिरीचे होत आहे. तरी ग्रामपंचायत ने याकडे जातीने लक्ष देऊन सदरील अतिक्रमण दूर करून परिसरातील अस्वच्छता दूर करावे अन्यथा याची वरिष्ठाकडे तक्रार करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे.