अमळनेर (प्रतिनिधी) हनुमान जन्मोत्सवानिम्मित मंगळग्रह मंदिरात स्थापित मंगलेश्वर पंचमुखी हनुमानाची विधिवत पूजा-अर्चा माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
मंगळग्रह मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात १० जानेवारी २०२१ रोजी काळ्या पाषाणातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा श्री भूमाता व पंचमुखी हनुमान यांची प्राणप्रतिष्ठा संत श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते करण्यात आलेली होती. त्यावेळी देखील पूजेचा मान हा कृषिभूषण दाम्पत्यालाच देण्यात आलेला होता हे विशेष. प्राणप्रतिष्ठेनंतर आज पहिल्यांदाच हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यासाठी मंदिराची आकर्षक सजावट देखील केलेली होती.
यावेळी खा.शि.मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले, विश्वस्त एस.बी.बाविस्कर, दिलीप बहिरम, गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. तसेच पौरोहित्य केशव पुराणिक यांनी केले. यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच हा सोहळा साजरा करण्यात आला.