चाळीसगाव (प्रतिनिधी) माहेरून ५० हजार रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात धनश्री दीपक शिंदे (रा. आमोदा ता.यावल, ह.मु. ओझर ता.चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ एप्रिल २०१९ पासून ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत पती दीपक देविदास शिंदे याने माहेरून ५० हजार रुपये आणावे म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली. तर सासरे देविदास जालम शिंदे आणि सासू शोभाबाई देविदास शिंदे (सर्व रा.आमोदे ता.यावल) यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन फिर्यदिचा गांजपाठ केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. किशोर पाटील हे करीत आहेत.