धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज महिला मंडळतर्फे हरतालिका तिज पूजन उत्साहात साजरा करण्यात आले.
हरतालिका या शब्दाची फोड ‘हरित’ म्हणजे ‘हरण’ करणे आणि ‘आलिका’ म्हणजे ‘आलिच्या’ मैत्रिणीच्या असा आहे. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरतालिका व्रत करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रसोबत भारतात महिला मोठ्या उत्साहाने हे व्रत साजरा करतात. कुमारिका आणि विवाहित महिला हे व्रत करतात. या दिवशी महिला पार्वती मातेची पूजा करतात. यंदा 31 ऑगस्ट म्हणजे येत्या बुधवारी गणरायाचे आगमन होणार आहे. म्हणजे गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी 30 ऑगस्टला मंगळवारी हरतालिका पूजा साजरी करण्यात आले. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:33 पर्यंत होते. तर 30 ऑगस्टला सकाळी 06:05 ते 08:38 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त होता. या व्रताच्या वेळी धरणगाव शिंपी समाज मंगल कार्यालय व दत्त मंदिर येथे चौरंग ठेऊन, केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा केली. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पाने, फुलांची पूजा अति उत्सहाने करण्यात आली आहे.
रजनी सुभाष मांडगे, वंदना मोहन मांडगे, धनश्री योगेश मांडगे, वच्छलाबाई प्रभाकर जगताप, सविता संदीप जगताप, मनीषा जितेंद्र जगताप, शैला राजेंद्र सोनवणी, मनीषा खुशाल मांडगे, मनीषा मनोज जगताप, वंदना सागर जगताप, ज्योती गणेश मांडगे,जयश्री जयंतीलाल जाला, हेमा अशोक मानकर, वैशाली जितेंद्र सोनवणी, भावना विशाल नेरपगार, सरिता विवेक मांडगे, साक्षी खुशाल मांडगे, वैष्णवी संदीप जगताप, भाग्यश्री जितेंद्र जगताप, मैथिली संदीप जगताप, हर्षदा मनोज जगताप यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून पूजा संपन्न केली.
















