मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ५६ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५१,३५६ कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. रविवारी राज्यात ६६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांदरम्यान कोरोनाचे ५६ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. जे संपूर्ण जगात सर्वात जास्त आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेत ३० हजार ७०१ आणि ब्राझीलमध्ये २८ हजार ९३५ केस आढळले आहेत. राज्यात एकूण संक्रमितांची संख्या ४७ हजारांच्या पार पोहोचली आहे. यामधून ६ लाख ६८ हजार ३५३ अॅक्टिव्ह पेशेंट्स आहेत. महाराष्ट्रात एकूण मृतांचा आकडा ७० हजार पार करत ७०,२८४ वर पोहोचला आहे. एकूण मृतांच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र जगाच्या २०९ देशांपेक्षा पुढे आहे.
उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालहून ट्रेनच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आता कोरोनाची RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणे अनिवार्य असेल. हा रिपोर्ट ४८ तासांच्या आतला असायला हवा. सरकारने ‘ब्रेक द चेन’ नुसार या संबंधी रविवारी आदेश जारी केले आहेत.