अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २७ वर्षीय महिलेच्या घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्यची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एकागावातील २७ वर्षीय महिलेच्या घरात दारू पीत मनोहर गोकुळ पाटील याने महिलेच्या घरात घुसून तिच्या मुलीसमोर असभ्य वर्तन करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी पिडीत महिलेने मनोहर पाटील याच्या विरोधात विनयभंगाचा अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील हे आक्रीत आहेत.
















