जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जळके ते लोणवाडी रस्त्यावर दोन अज्ञात इसमांनी ८० वर्षीय वयोवृध्दाच्या हातातून सोन्याची चैन व अंगठी हिसकावून दोन अज्ञात दुचाकीस्वार पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात दोन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शामराव लुटू तायडे (वय ८० रा. प्लॉट नं २०, दौलत नगर, मोहाडी रोड जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शामराव तायडे हे ॲक्टीव्हा मोटर सायकल ने जात असतांना दोन अनोळखी मोटर सायकल स्वार यांनी तायडे यांना हात दाखवून थांबविले. दोन अज्ञात इसमांनी सांगितले की, इकडे चोऱ्या होतात असे सांगून तायडे यांच्या गळयातील १ लाख २६ हजार रुपये किंमतीची त्यात ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १२ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून रुमालात गुंडाळुन गाडीचे डिक्कीत ठेवण्यास सांगितले. सदरचे अंगठी व चैन तायडे यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवण्याचा बहाणा करुन सदरची चैन व अंगठी दोन अज्ञात मोटर सायकल स्वार इसमांनी घेत लंपास केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात दोन अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सपोनि अमोल मोरे हे करीत आहेत.
















