परभणी (वृत्तसंस्था) शेतातील विहिरीत पडल्याने बुडून सख्ख्या बहीण- भावाचा मृत्यू झाल्याची काळीज चिरणारी घटना पूर्णा तालुक्यातील महागाव येथे २३ ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास घडली. राजवीर अनिल भुमरे (६), गौरी अनिल भुमरे (८) असे मयत बहीण- भावाचे नाव आहे.
लिंबाजी रोडगे यांची मुलगी माहेरी मुला मुलीसह काही दिवसांपूर्वी आलेली होती. दि.२३ रोजी दुपारच्या सुमारास बहीण भाऊ महागाव शिवारात असलेल्या शेतातील आजोबांच्या घरासमोर खेळत आसतांना घरोसमोर असलेल्या विहिरीत पडून राजवीर भुमरे आणि गौरी भुमरे या दोघांचा विहिरीतील पाण्यात पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे महागाव व परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके व ताडकळस पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढिल वैद्यकीय कार्यवाहीसाठी धानोरा काळे येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात या बहीण भावाचे मृतदेह आणण्यात आले होते. यावेळी आईसह इतर नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.