TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा – डॉ. अण्णासाहेब टेकाळे

ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा कांताई सभागृह येथे संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
March 23, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहिण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आई-आजोबा म्हणून मदत केली पाहिजे. कुटुंब पद्धती ज्याप्रमाणे बदल आहे त्याप्रमाणे समाजातील ज्येष्ठाविषयीचे आचरणही बदलत आहे. त्यामुळेच सरकारसोबत समाजातील प्रत्येक घटकाने वृद्धांविषयी आपली जबाबदारी व कर्तव्य ओळखली पाहिजेत, गाव तेथे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ही संकल्पना राबवून तेथील ज्येष्ठांना आर्थिक अनुदान दिले पाहिजे, रेल्वे मधील आरक्षणाची मागणीसाठी पाठपुरावा सुरू असुन ती पुर्णत्वास देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होत असल्याची माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी दिली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून माजी अध्यक्ष, खान्देश प्रादेशिक विभाग धुळे व ज्येष्ठ नागरिक संघ चैतन्य नगर जळगाव तर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळेत डॉ. अण्णासाहेब टेकाळे अध्यक्ष म्हणून बोलत होते. ही सभा कांताई सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून जैन इरिगेशनचे मिडीया विभागप्रमुख अनिल जोशी उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र व गोवा राज्याचे बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष ऍड. भरत देशमुख, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी, अरूण रोडे, उपाध्यक्ष अंजुमन खान, माजी कार्यवाहक प्रकाश घादगिने, खान्देश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष बी. एन. पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत कार्यवाहक जगतराव पाटील, ऍड. प्रभाकर घुमासे, अरूण माळी, डॉ. एस. आर. पाटील, एस. बी. महाजन, रमेश जोगी, विजय करोडपती, बाळकृष्ण वाणी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

READ ALSO

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

कार्यक्रमाच्या सुरवातीला खरा तो एकची धर्म… ही प्रार्थना बी. एन. पाटील यांनी म्हटली. राज्य गीत गर्जा महाराष्ट्र माझा.. हे स्वरवेध फाऊंडेशनचे भागवत पाटील सह कलावंतांनी सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरीकांची लक्षणिय उपस्थिती होती. प्रास्ताविक डी. टी. चौधरी यांनी केले. प्रतिभा पाटील यांनी सुत्रसंचालन केले. शालिनी सोनवणे यांनी आभार मानले. यावल समाचार पत्रिकेचे प्रकाशन झाले यशस्वीतेसाठी विश्वासराव सोनवणे, प्रकाश नाईक, दिलीप बोरसे, के. डी. पाटील, विकास बोरोले यांच्यासह कार्यकारिणी मधील सदस्यांनी सहकार्य केले. पसायदाने समारोप झाला.

संघटनेची कार्यपद्धती, घटनेने कार्यकर्त्यांनी दिलेले अधिकारी, समाजसेवेसाठी असलेली जबाबदारी, आनंदी वृद्धत्व, ज्येष्ठांविषयी कायदे आणि त्याद्वारे मिळणारे संरक्षण, शासकीय योजनांविषयी माहिती यासह विविध विषयांवर कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला.

उदघाटक म्हणून अनिल जोशी यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्यात. ऍड. भरत देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीचा २००७ च्या कायदेविषयक तरतुदी बाबत अवगत केले. दिवाणी न्यायालयाने दिलेले अधिकार, प्रत्येक जिल्हा व तालुका आणि गाव पातळीवर असलेल्या समन्वय समितींचे अधिकार, निर्वाहाचा आदेश यासह अन्य महत्त्वपूर्ण कायदेविषयक माहितीवर त्यांनी विवेचन केले. ज्येष्ठ नागरिकांनी जर मुलगा-मुलींना स्थावर व जंगम मालमत्ता नावे केली असेल तर ती पुन्हा परत घेता येऊ शकते याविषयीचा उपस्थित ज्येष्ठांमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला.

जगतराव पाटील यांनी ज्येष्ठ शेतकऱ्यांकडे नेहमी दुर्लक्ष होत असल्याची बाब लक्षात आणून दिली. शहरातील ज्येष्ठांना पेन्शनसह अन्य सुविधा मिळत असतात त्यामानाने ग्रामीण भागातील ज्येष्ठांना आधार मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

बी.एन.पाटील यांनी तुकाराम महाराजांचे भजन म्हटले. प्रकाश घादगिने यांनी ‘वयोवृद्ध मनोयुवा’ याविषयी सांगत परिवर्तन हे ज्येष्ठांमुळे होऊ शकते सांगितले. ज्याप्रमाणे शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार असला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे असे सुचविले. ज्येष्ठांसाठी असलेले स्वतंत्र महामंडळाला आर्थिक तरतुद करुन त्याचा लाभही मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. अंजुमन खान यांनी ही मनोगत व्यक्त केले.

डी. टी. चौधरी यांनी आनंदी वृद्धत्व ह्याविषयी सांगितले. अरूण रोडे यांनी संघटनेच्या मसुदा घटनेविषयी सांगितले. घटना ही प्रत्येक कार्यकर्त्याजवळ असावी जेणेकरून आवश्यकता असणाऱ्यांना मदत करता येईल व समाजभिमुख काम पुढे नेता येईल.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांनी प्रश्नोत्तरोद्वारे आपल्या शंकाचे निरसन करुन घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonHelp the elderly as beloved parents and grandparents – Dr. Annasaheb Tekale

Related Posts

जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
सामाजिक

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
Next Post

विद्यार्थ्यांना अधिसभेच्या थेट प्रक्षेपणात सहभागी होण्याची ॲड. जमील देशपांडेंची राज्यपालांकडे मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात डॉक्टरसह तिघांना मारहाण ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !

October 30, 2023

खाली वाळू टाकून दिखाव्यासाठी वर रचला खडीचा थर ; एमआयडीसी पोलिसांनी पकडले टॅक्टर

September 30, 2020

मृत्यूशी मला मैत्री करायची आहे ; चिठ्ठी लिहून आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीची आत्महत्या !

April 5, 2022

लाऊडस्पीकरबाबत न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यानं दोन मशिदींवर गुन्हा दाखल

May 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group