जळगाव (प्रतिनिधी) आज सकाळी ६ वा. गुढी पूजन करून ६.१५ वाजता सर्व कलाकारांनी भाव – गीत सदर करून सुरवात केली. बहिणाबाई चौक येथे जळगाव शहराचे लोकप्रिय आ. सुरेश भोळे (राजु मामा) यांच्या सौजन्याने सप्त सुराच्या संगीतमय वातावरणात पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त “पाडवा पहाट” या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्त सुराच्या पाडवा पाहाट या संगीतमयची ७.३०पर्यंत समाप्ती करण्यात आली.
सर्व प्रथम प्रभू श्रीराम, भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महाराणा प्रताप जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शहराचे आमदार सुरेश भोळे (राजु मामा) महापौर सीमा भोळे यांनी व जिल्हा प अध्यक्षा रंजना पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, नगरसेविका ॲड सुचीता हाडा, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ विरण खडके, राजेंद मराठे, महेश चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, यांनी गुढी चे पुजन केले. याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, सरचिटणीस चेतन तिवारी, गणेश माळी, जयेश पाटील, धीरज वर्मा गुढीचे पूजन केले. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सप्त सूर कलाकार मनिषा कोल्हे, भुषण खैरनार, अमित सोळूंके, विजय पाटील, वरुण नेवे, सेजल वाणी, मानसी असोदेकर, संहिता जोशी(तबला) साथ- सुयोग गुरव (हार्मोनियम) साथ -भूषण खैरनार सुत्रसंचालन- शुभदा नेवे सप्तसुर वाद्यवृंद अमित सोळुंके जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित होते. आणि सदरील कार्यक्रमला नागरिक व संगीतमय नगरीकांनी उत्सपुर्त प्रतिसाद दिला व सर्व असाच कार्यक्रम पुन्हा: घेण्याच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि आ. सुरेश भोळे (राजू मामा) यांनी नागरिकांना गुडीपाडवाच्या शुभेच्छा दिल्या
















