चोपडा (लतीश जैन) तालुक्यातील वैजापूर ग्रुप ग्रामपंचायतीत सर्वानुमते नुकतीच विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली होती. या ग्रामसभेत धर्म परिवर्तन करणाऱ्यांना आदिवासींची कोणतेही सवलत मिळू नये, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
सातपुड्याच्या पर्वतात आदिवासी बांधव राहत असल्याने काही लोक अमिषाला बळी पडून धर्म परिवर्तन करीत असतात. धर्म परिवर्तन चिंतेची एक बाब होऊन गेलेली आहे. आदिवासींना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्यास काहीही लोक भाग पाडत असतात. याला कुठेतरी आळा बसावा व धर्म परिवर्तन रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी तालुक्यातील वैजापूर ग्रुप ग्रामपंचायतीत सर्वानुमते विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली. या सभेत प्रामुख्याने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ज्या आदिवासी बांधवांनी धर्म परिवर्तन केलेले आहे किंवा करणार आहेत, अशा लोकांनी आपले कागदपत्रांवर सुद्धा त्या धर्माचं उल्लेख करावा जेणेकरून आदिवासींचे कोणतीही सवलत मिळणार नाही. आपण सर्व मिळून तसे शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन धर्म परिवर्तन केलेल्या आदिवासींना सवलती पासून वंचित ठेवू असा निर्णय ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला असा निर्णय घेणारी जिल्ह्यात पहिलीच ग्रामपंचायत असावी असेही बोलले जात आहे.
यामुळे धर्म परिवर्तन करणाऱ्या आदिवासींना चांगली चपराक बसली आहे. धर्म परिवर्तन करणाऱ्या आदिवासींनी आपल्या सर्व कागदपत्रांवर सुद्धा धर्म बदलण्याच्या उल्लेख करावा व आदिवासींच्या एकही योजनेच्या लाभ घेऊ नये, असेही ठरावात नमूद करण्यात आले. तसेच जो समाज स्विकारला असेल त्यांनी त्या समाजात जाऊन राहावे. आदिवासीमध्ये सुध्दा राहू नये. आदिवासी व इतर समाजाच्या दोघ सवलती घेऊ नये. याबाबत प्रशासनाने देखील लक्ष दयावे.
आदिवासीच्या सवलती पासून अश्या धर्म परिवर्तन करण्याऱ्या बांधवांना वंचित ठेवावे. जेणे करून धर्म परिवर्तनला आळा बसेल असेही प्रतिक्रिया ग्रामसभेत दिसत होती.यावेळी ग्रुप ग्रामपंचायत असल्याने वैजापूर,मुळ्याअवतार, खाऱ्यापाडव,शेणपाणी येथिल ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हजर होते. यात प्रामुख्याने लोकनियुक्त सरपंच – दत्तरसिंग सुभाष पावरा , उपसरपंच – विद्या गुमान बारेला, ग्रामसेवक -आर.बि.तडवी, कारकून- राजू जगन पिप्रांळे प्रविण राजू बारेला – (गाव पाटील,शेनपाणी) संजय देवसिंग, शिवराम थावया, भायला बालजी, रमेश गुलाब बारेला, गुंजाया रामसिंग, वना बालजी, शेनपाणी ग्रामसेवक मधू काळू बिलरसिंग वांग्या वैजापूर, गाजू दलसिंग हासिराम नरसिगं(गाव पाटील वैजापूर),वाघजी हाजी,नाजेंद्र चंपालाल, सुकदेव अगन् ओंकार अमरसिंग पंडीत गोविंदा कोळी, कैलाश जगन पिंझाळे, बारकू गंगाराम कोकणी, डोंगरसिंग महाराज, गुमान सुरभान बारेला, युवराज गुलाब भरतसिंग रामसिंग कोळी गिरासे ,गजमल बिलाड़या पावरा, दाविद रामसिंग कांजन्या, सुकलाल सर्कल पूना खजान भंग्या, (गाव पाटील खाऱ्यापडाव) आदिंनी स्वाक्षरी केल्या असल्याची बिलारसिंग भादले वैजापूर यांनी माहिती दिली.