नशिराबाद (प्रतिनिधी) येथील साथी बाजार परिसरात असलेल्या अजिंक्य (महिला) मंडळात यंदा प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी गावात इतिहास घडला असून दुर्गा मातेच्या आरतीला मुस्लिम बांधवांनीही उपस्थिती देऊन सहभाग नोंदविला. तसेच महिला मंडळांनी राबवलेल्या दहा दिवसीय विविध उपक्रमातून सर्वांनीच कौतुक करावे तितके कमीच, असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळात महिलांनी पुढाकार घेतला असून दहा दिवस मंडळाचा सर्व कारभार महिलाच सांभाळणार आहे तर या उत्सवादरम्यान जातीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नवरात्र उत्सवात नशिराबाद गावात प्रथमच अजिंक्य (महिला) मंडळ स्थापन करून यंदा दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. यात दहा दिवसात अजिंक्य महिला मंडळाचा कारभार महिला भगिनी सांभाळणार असून या उत्सवादरम्यान विविध समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. तर महिलाच मातेची गरबा, दांडिया खेळत स्थापना व विसर्जन ही करणार आहे.
जातीय सलोखा कार्यक्रमात मुस्लिम बांधवांची उपस्थिती
राज्य शासनाच्या नियमानुसार विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि शिबिर घेण्याचे नियमावली जाहीर झाली आहे.याच माध्यमातून अजिंक्य (महिला)दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने जातीय सलोखा कार्यक्रम राबविण्यात आला जेणेकरून गावात सर्व धर्म एकत्र येऊन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा. ही संकल्पना महिला पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गावातील सर्वधर्म वासियांनी दुर्गा मातेच्या आरतीला बोलून एक वेगळाच इतिहास घडवला. यावेळी सर्व समाज बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी नशिराबाद पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या हस्ते दुर्गा मातेची आरती करण्यात आली.
मातेच्या आरती प्रसंगी मुस्लीम बांधवही उपस्थिती
सर्व समाज बांधव एकत्र येऊन आप आपले सण-उत्सव साजरे करतेवेळी एकमेकांच्या उत्सवात इतर समाज बांधवांनी सहभाग नोंदवून विविध उपक्रम घेत उत्सव साजरे करावे. यातून सामाजिक व जातीय सलोखा राखण्यासाठी या उपक्रमात ही संकल्पना अजिंक्य महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येतात गावातील सर्व धर्म पदाधिकाऱ्यांना आरती प्रसंगी बोलून जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न महिला मंडळाच्यावतीने करण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांना सोबत सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीत दुर्गा मातेची आरती सोहळा पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील, राष्ट्रवादीचे सय्यद बरकत अली, विनोद रंधे, सय्यद नजीर अली, योगेश पाटिल, ललित बर्हाटे, नवाब सर, सांडू पैलवान, शेख अमजद, काजिम भाई, देवेंद्र पाटिल, भुषण कोल्हे, सत्तार पहेलवान, शेख चॅद शेख, अजिज आदींसह सह मान्यवर उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यावेळी अजिंक्य महिला मंडळात जातिय सलोखा कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी अजिंक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन नांदुरकर, किरण शिवरामे, यश पाटील, एकनाथ चौधरी, श्रीकांत भावसार, मिलिंद शिवरामे, योगेश बाविस्कर, तेजस यवकार, प्रकाश सपकाळे, भरत राजपुत, शारदा भावसार, संगीता चौधरी, सुनीता शिवरामे, पुष्पा नांदुरकर, साधना पाटील, माधुरी कोलते, रेखा यवकार, हर्षाली महाजन, धनश्री पाटिल, कामिणी शिवरामे, साक्षी यवकार, माधुरी धोञे, दिपा बाविस्कर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होत्या.