TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे ‘छत्रपतींचे स्वराज्य-अठरा पगड जातींचे’ विषयावर लक्ष्मण पाटलांचे व्याख्यान

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील जागृती युवक मंडळाच्यावतीने ‘छत्रपतींचे स्वराज्य-अठरा पगड जातींचे’ या विषयावर लक्ष्मण पाटील यांचे व्याख्यान व मंडळाच्या जेष्ठ सदस्यांचा कृतज्ञता (सन्मान) सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील ३७ वर्षांपासून नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण रीतीने नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या जागृती युवक मंडळाने यावर्षी एक अनोखा उपक्रम राबविला. “व्याख्यान व कृतज्ञता सोहळा” अशा स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे तसेच विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकातून मंडळाचे माजी अध्यक्ष कडू रूपा महाजन यांनी मंडळाचा इतिहास सांगितला. मागील अनेक वर्षांपासून नानाविध सांस्कृतिक उपक्रम राबवून आम्ही सामाजिक समतेचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लहान माळी वाडा परिसरातील विविध जाती समूहाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन या मंडळाच्या माध्यमातून जातीय व सामाजिक सलोखा टिकवण्याचे काम केले आहे, अशी भावना कडू महाजन यांनी व्यक्त केली.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

कार्यक्रमात आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर मंडळाच्या जेष्ठ सदस्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व हयात असलेल्या व दिवंगत झालेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यामध्ये पांडुरंग मराठे (मोठा भाऊ), कडू रूपा महाजन, रघुनाथआप्पा चौधरी, पुंडलिकनाना महाजन, अरुणदादा पाटील, नितीनजी कापुरे तसेच कै. अशोक शंकर पाटील यांच्या वतीने परशुराम पाटील, कै. सुकदेव काशिराम पाटील यांच्या वतीने अशोक पाटील, कै. विठ्ठल शिवलाल पाटील यांच्या वतीने गणेश पाटील यांचा शाल – श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष – मुख्य वक्ते लक्ष्मण पाटील यांनी जागृती युवक मंडळाच्या सर्व जेष्ठ सदस्यांबद्दल बोलतांना सांगितले की, आम्ही शिवविचार वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करतो परंतु ही मंडळी प्रत्यक्ष शिवविचार जगत आहेत. शिवरायांचे स्वराज्य अठरा पगड जातींचे म्हणजेच बारा बलुतेदारांचे राज्य होते. शिवचरित्रातील काही निवडक प्रसंग सांगितले त्यातून त्याग आणि समर्पणाची भावना व्यक्त केली. आजचा कृतज्ञता सोहळा म्हणजे युवकांनी बाप माणसांचा केलेला गौरव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून शिवचरित्रातून ऊर्जा मिळते असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डी.जी.पाटील यांनी सर्व जेष्ठ मान्यवरांच्या कार्याची भरभरून स्तुती केली. त्याचबरोबर लक्ष्मण पाटील यांच्या भाषणाचे देखील खूप कौतुक केले. तरुणांनी विचारांचे नाते समजून घेतले पाहिजे व पुरोगामी विचारांचा वारसा जपला पाहिजे, असे मत पाटील साहेबांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डी.जी. पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, माळी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, तेली समाजाचे अध्यक्ष सुनिल चौधरी, मराठे समाजाचे अध्यक्ष पांडुरंग मराठे, मरीमाता मंदिर संस्थानचे अध्यक्ष किशोर पहेलवान, उपाध्यक्ष रमेश चौधरी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, भाजप गटनेते कैलास माळी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र ठाकरे, जगदंबा कन्स्ट्रक्शनचे वाल्मिक पाटील, नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, सुरेश (बुट्या) महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष निमंत्रित व्यक्तींमध्ये राजेंद्र पाटील (महाले), महेश्वर पाटील,आबासाहेब राजेंद्र वाघ, पी.डी.पाटील, हेमंत माळी, किशोर पवार, नामदेव मराठे, एस.एल.सूर्यवंशी, मनोज गुजर, नरेंद्र पाटील, अमोल सखाराम महाजन, मनोज महाजन, गोरख देशमुख, निलेश पवार, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, समीर तडवी, अमोल सोनार, वसंत पाटील, धनराज महाजन, विशाल देवरे, राकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र किसन महाजन, राजेंद्र मांगो महाजन, गणेश पाटील, आनंद पाटील, पंकज पाटील, हरी महाजन, अक्षय पाटील, आकाश महाजन, रुपेश मराठे, जितू महाराज, धनराज महाजन, वासुदेव महाजन, ज्ञानेश्वर चौधरी, रुपेश पाटील, बंटी चौधरी, पवन पाटील, गोकुळ पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी कृष्णा टेंट व जगदंबा टेंट तसेच मरीमाता मंदिर संस्थान धरणगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला मरिमाता परिसरातील बंधू-भगिनी तसेच देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकल्प ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा.रविंद्र मराठे यांनी तर आभार प्रदर्शन पाटील समाज पंच मंडळाचे संचालक गणेश पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास, व्हिडीओ शूट करुन आत्महत्या !

October 14, 2021

एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेसाठी २० लाखांचा निधी मंजूर !

March 19, 2023

वैद्यकीय अधीक्षकास ४८ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक !

December 24, 2023

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण !

February 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group