मुंबई (वृत्तसंस्था) एखाद्या लहान मुलीचा हात पकडणे किंवा पॅंटची चेन उघडणे ही गोष्ट लैंगिक शोषणाअंतर्गत येत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नुकतच एका निकालात नोंदवलं आहे. पोक्सो अंतर्गत या गोष्टींना लैंगिक शोषण म्हणता येणार नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी हा निकाल दिला आहे. याआधीचा निर्णयही गनेडीवाला यांनीच दिला होता.
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं अल्पवयीन मुलीच्या छातीवरील कपड्यांना स्पर्ष करणं गुन्हा नसल्याचा निकाल दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका निकालानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अल्पवयीन मुलीचा हात पकडणं आणि तिच्यासमोर एखाद्या पुरुषानं पँटची झिप उघडणं गुन्हा नाही, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी हा निकाल दिला आहे. याआधीचा निर्णयही गनेडीवाला यांनीच दिला होता. अल्पवयीन मुलीच्या छातीवर असलेल्या कपड्यांना स्पर्श करणं हा गुन्हा नाही. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार ठरू शकतो, असं मत गनेडीवाला यांनी नोंदवलं होतं. कनिष्ठ कोर्टानं याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीला पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षा सुनावली होती. कनिष्ठ कोर्टाचा निकाल बदलून आरोपीची ३ वर्षांची शिक्षा एका वर्ष करण्यात आली. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये या निकालाची जोरदार चर्चा झाली. विविध प्रतिक्रिया यावर उमटू लागल्या. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं याची दखल घेतली. गनेडीवाला यांच्या निकालाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली.
गनेडीवाला यांच्या निकालावर टीका केली जाऊ लागल्यावर त्यांनी याआधी दिलेल्या निकालांवरही चर्चा होऊ लागली आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी गनेडीवाला यांनी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एक निर्णय दिला होता. एखाद्या पाच वर्षांच्या मुलीसमोर पँटीची झिप खोलणं हा पॉक्सो अंतर्गत गुन्हा ठरू शकत नाही. यावर भारतीय दंडविधान ३५२ अ अंतर्गत लैंगिक छळाची कारवाई होऊ शकते, असं म्हटलं होतं.
१२ पेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत घडलेला हा गुन्हा असल्यानं गडचिरोली सत्र न्यायालयानं साल २०१९ मध्ये या प्रकरणातील आरोपीला ‘पोक्सो’ अंतर्गत दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिच्या मुलीचा हात पकडला होता आणि त्यावेळी त्याच्या पॅण्टची चेनही उघडी होती, असं या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपीनं चेन उघडून आपलं गुप्तांग बाहेर काढत मुलीला स्वत: जवळ झोपण्यास सांगितल्याचा खुलासा केल्याचंही या महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. त्या आधारावर आरोपीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.