नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सतत कॉन्सर्ट करणारा हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर आता काही काळ विश्रांती घेणार आहे. याचं कारण म्हणजे त्याला एक दुर्मीळ आजार झाला आहे. 28 वर्षीय जस्टिन बीबरच्या चेहऱ्याला पार्श्यल पॅरालिसिस (Paralysed attack) झाला आहे. जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्याला रामसे हंट सिंड्रोम हा दुर्मीळ आजार झाल्याचं निदान झाल्याचं त्याने सांगितलं आहे.
जस्टिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो आहे की, ‘तुम्ही बघू शकता, मी माझे डोळे बंद करू शकत नाही, मी माझ्या चेहऱ्याच्या या बाजूला हसू शकत नाही, माझे नाक हालत नाही’ .’ आपल्या वर्ल्ड टूरबद्दल सांगताना तो म्हणाला. ‘माझ्या चेहऱ्याच्या या बाजूला पूर्ण अर्धांगवायू आहे. त्यामुळे माझा पुढचा शो रद्द झाल्याने नाराज आणि निराश आहे, टूरसाठी मी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. हा एक गंभीर रोग आहे, जो आपल्याला दिसतोय. जस्टिन बीबरने त्याच्या पोस्टला कॅप्शन दिले, ‘महत्वाचे आहे हे. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्यासाठी प्रार्थना करा.
जस्टिन बीबरचे काही चाहते त्याचा आगामी शो रद्द झाल्याने खूप नाराज झाले. याबद्दल बोलताना जस्टिनने सांगितले की, तो सध्या स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकत नाही. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. याविषयी त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘ही गोष्ट खूपच गंभीर आहे, तुम्ही बघू शकता. माझी इच्छा आहे तसे असे झाले नाही, परंतु माझं शरीर विश्रांती मागत आहे. मला वाटते की मी थोडे शांत व्हावे. मला आशा आहे की तुम्ही लोक समजून घ्याल आणि मी हा वेळ विश्रांतीसाठी आणि आराम करण्यासाठी काढणार आहे. जेणेकरून मी 100 टक्के बरा होऊन पुन्हा परत होऊ शकेन.
रामसे हंट सिंड्रोम काय आहे?
रामसे हंट सिंड्रोम किंवा RHS हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल रोग आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर वेदनादायक पुरळ येतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायूही होऊ शकतो. यामुळे कानात बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते.