अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे उपक्रमशील प्राथमिक शिक्षक संदिप पाटील यांचा जळगाव येथील सद्गुरू भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालविश्व इंग्लिश मेडियम स्कुलतर्फे सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त आयोजित “Thank a Teacher” अभियानानंतर्गत शिक्षक गौरव कार्यक्रमात विशेष शैक्षणिक योगदानाबद्दल शिक्षक संदिप पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी शिक्षक संदिप पाटील यांनी आतापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच कोरोना काळात देखील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुस्तक वाटप, अभ्यासिका वाटप, शिक्षक आपल्या दारी असे विविध उपक्रम राबविले. उपक्रमशील शिक्षकांना पुढील भावी शैक्षणिक कार्यास प्रेरणा मिळावी. यासाठी शिक्षक दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केल्याचे शाळेच्या प्रा. भारती चौधरी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.