अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना काळात स्वताच्या आरोग्याची काळजी न करता लोकहिताचे उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर यांचा खानदेश साहित्य संघाच्यावतीने गौरव करण्यात आला.
कोरोना काळातील जून महिन्यात अमळनेर शहरात कोरोनाची प्रचंड दहशत असतांनाच नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्याची तपासणी करून शासन निर्देशानुसार कार्य केले व एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. गोक्षेत्र प्रतिष्ठान संचलित अन्नक्षत्रात ३ लाख लोकांपर्यंत अन्न पुरवठा करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. शिरुड येथे पहिला कोरोना रुग्ण आढळला असता गावात कोरोना जनजागृती व फवारणी साठी योगदान दिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमाल विकणारे शेतकऱ्यांची सोय करून दिली. मार्च महिन्यात सर्व प्रथम रक्तदान करुन रक्तदान करण्यासाठी इतर लोकांना प्रवृत्त केल्याबद्दल डी ए धनगर यांचा सत्कार अशोक इसे, छाया इसे, वाल्मिक मराठे, रेखा पाटील, रत्नाकर पाटील, सुनिता पाटील, जयश्री पवार, उमेश काटे, शरद पाटील, कुणाल पवार, दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण बाविस्कर, कल्पना पाटील यांनी केला.