चोपडा (प्रतिनिधी) चोपडा औद्योगिक वसाहतीचे चेअरमन पपुशेट सोनार, व्हाईस चेअरमन रमेशमामा शिंदे व नवनिर्वाचित संचालक या सर्वांचे जिल्हा उद्योग केंद्र जळगाव येथे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील तसेच व्यवस्थापक डोंगरे यांनी सत्कार केला.
तसेच भविष्यात औद्योगिक चोपडा औद्योगिक वसाहतीसाठी मूलभूत सोयी सुविधा काय देता येतील यावर चर्चा केली. चोपडा औद्योगिक वसाहतीची व्यवस्थापक राजू तडवी तसेच समीर भाटिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
















