चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात दि. १५ मार्च २०२२ रोजी विद्यापीठस्तरीय युवारंग स्पर्धेत सर्वसाधारण द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब अँड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा सौ.आशाताई विजय पाटील, सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एच. जी. चौधरी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते युवारंग स्पर्धा व उमवि करंडक स्पर्धेत विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या युवारंग स्पर्धेत महाविद्यालयातील संघांनी संगीत कलाप्रकार भारतीय समूह गायन (सुवर्ण पदक), गौरी दीपक चौधरी, अपूर्वा पवन पाटील, निकिता भैय्यासाहेब बाविस्कर, विशाल सपकाळे, गणेश कोळी, दिपक राजेंद्र माळी, (ब) शास्त्रीय सुरवाद्य वादन (सुवर्ण पदक), विवेक मधुकर बाविस्कर, पाश्चीमात्य समूह गायन (रजत पदक), गौरी दीपक चौधरी, अपूर्वा पवन पाटील, निकिता भैय्यासाहेब बाविस्कर, विशाल सपकाळे, जयेश सुनील महाजन, दिपक राजेंद्र माळी, (ड) भारतीय सुगम गायन (रजत पदक), विशाल सपकाळे, (इ) भारतीय लोकगीत (रजत पदक), जयेश सुनील महाजन (प) शास्त्रीय तालवाद्य वादन (रजत पदक), हेमांग सुनील गुजराथी, (फ) शास्त्रीय गायन (रजत पदक), विवेक मधुकर बाविस्कर, (भ) लोकसंगीत (रजत पदक), विशाल सपकाळे, स्वप्निल सुतार, दिपक राजेंद्र माळी, निकिता भैय्यासाहेब बाविस्कर, विवेक चंद्रकांत जोशी, निलेश संजय कुंभार, नाट्य कलाप्रकार मूकनाट्य (सुवर्ण पदक) तुषार सोनवणे, योगेश पाटील, राहुल गोविंदा निकुंभ, जगदीश सुरेश पाटील, हितेशा संजय हडप रचना नंदकिशोर अहिरराव, (ब) विडंबन नाट्य- (कांस्य पदक), राहुल गोविंदा निकुंभ, जगदीश सुरेश पाटील
हितेशा संजय हडप, रचना नंदकिशोर अहिरराव, दिव्यांनी महेंद्र पठार, ललित कलाप्रकार, व्यंगचित्र (सुवर्ण पदक) साक्षी सुधाकर पाटील, (ब) कोलाज (सुवर्ण पदक) इशरत शेख.
उमवि करंडक-२०२१ निकालपत्र : सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – म्याडम (चषक, सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र व ७००१ रुपये), उत्कृष्ट स्त्री अभिनय (प्रथम)– गौरी दीपक चौधरी, उत्कृष्ट दिग्दर्शन (प्रथम)– दिव्यांनी महेंद्र पठार, उत्कृष्ट प्रकाश योजना (प्रथम)– जगदीश पाटील, उत्कृष्ट संगीत योजना (द्वितीय)– जयेश सुनील महाजन, उत्कृष्ट स्त्री अभिनय नैपुण्य – (1) हितेश संजय हडप, रचना नंदकिशोर अहिरराव, उत्कृष्ट रंगभूषा (प्रथम)– अपूर्वा पवन पाटील
उत्कृष्ट नेपथ्य (प्रथम) – १) हर्शल निकम २) जगदीश पाटील या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संघव्यवस्थापक डॉ. एच. जी. चौधरी, संगीत विभाग प्रमुख किशोर खंडाळे, मार्गदर्शक मकरंद चौधरी, प्रा. साक्षी बिडकर, हेमंत चौधरी, राकेश वाणी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब अँड. संदीप सुरेश पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘महाविद्यालयाचे विद्यार्थी अतिशय प्रतिभा संपन्न असून विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतल्यामुळेच महाविद्यालय प्रत्येक स्पर्धेत यश प्राप्त करते’. युवारंग स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून सर्वसाधारण द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल त्यांनी सर्व संघाचे व संघप्रमुख डॉ. हरेश चौधरी यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए. वाघ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डी.डी. कर्दपवार, एम.ए.पाटील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.