मेष : तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार लोकांचा आजचा दिवस आनंदी जाईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. बेरोजगार तरुणांना रोजगार मिण्याची शक्यता आहे. झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमाल.
वृषभ : आज उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. मोठ्या नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल.
मिथुन : नव्या नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल. काही संमेलनांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. मानसिक त्रास वाढू शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आज वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचे लोक कौतुक करतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातातील कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. मुलांसाठी नवीन वस्तु खरेदी कराल.
कर्क : नोकरदार लोक दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. बोलण्यात गोडवा ठेवा, अन्यथा अडचणीत येऊ शकता. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. कलेतून चांगले मानधन मिळेल. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
सिंह : कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. व्यवसायातील जास्त कामामुळं थोडा तणाव येऊ शकतो. सर्व कामे पूर्ण होतील. सासरच्या मंडळींकडूनही आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल. चांगली संगत लाभेल.
कन्या : नोकरीत लाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती दिसेल. पदातही वाढ होणार आहे. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद संभवतात. चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल.
तूळ : उत्पन्नातही वाढ होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही जो व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात यश मिळेल. कौटुंबिक ताणतणाव जाणवेल. हातापायास किरकोळ इजा संभवते. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील.
वृश्चिक : मित्रांचेही सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. राजकीयदृष्ट्या यश मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नवीन नोकरीची ऑफर देखील येईल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. स्वत: चेच मत खरे कराल. आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. कर्तबगारीला चांगला वाव आहे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.
धनू : खादे काम पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक योजना फलदायी ठरतील. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. मित्रांच्या मदतीने तुमचे उत्पन्न वाढेल. बेरोजगार तरुणांना चांगला रोजगार मिळू शकतो. नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. स्वत:मध्ये काही बदल कराल. प्रवासात काही त्रास होण्याची शक्यता आहे. अडथळ्यातून मार्ग काढावा. उगाच चीड-चीड करू नये.
मकर : मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. संयम कमी होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. त्रासातून मार्ग निघेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धाडसाने कामे हाती घ्याल. आरोग्यात सुधारणा संभवते.
कुंभ : नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळणार आहे. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत मिळेल. नोकरीमध्ये तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन मित्र जोडावेत. हस्त कलेसाठी वेळ काढावा. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करावे.
मीन : धन, मान-सन्मान, कीर्ती यात वाढ होईल. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्न वाढेल. खर्चही वाढतील. परंतू, आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळं सर्व खर्च तुम्हीच कराल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल. लपवाछपवीचे व्यवहार करू नका. (Today Rashi Bhavishya, 24 February 2023)