मेष : आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद – विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. मानसिक चंचलता दूर सारावी. नवीन विचारांना चालना द्यावी. चमचमीत पदार्थ खाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील.
वृषभ : आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. मनासारख्या घटना घडून येतील. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेमसौख्यात भर पडेल.
मिथुन : आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यावसायिक धोरण लक्षात घ्यावे. नवीन आव्हाने स्वीकाराल. बिनधास्त पणे वागू नका. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल.
कर्क : आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील. सार्वजनिक कामात मदत कराल. सरकारी नोकरदारांना प्रगती करता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल. यशाला गवसणी घालता येईल.
सिंह : आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. प्रेमिकांनी अती वाहत जाऊ नये. हाताखालच्या लोकांना चलाखीपणे सांभाळा. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दान धर्माचे पुण्य पदरात पडून घ्यावेत.
कन्या : आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराला आपले मत स्पष्ट पणे सांगा. मनातील संभ्रम दूर करावेत. इतरांना सहृदयतेने मदत कराल. भागीदारीत चांगला लाभ होईल.
तूळ : आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी – व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. नातेवाईकांना मदत कराल. मनातील शंका-कुशंका काढून टाकाव्यात. पैज जिंकता येईल. अचानक धनलाभ संभवतो. देणी फेडता येतील.
वृश्चिक : आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. व्यावसायिक अनुकूलता लाभेल. काही नवीन संधी उपलब्ध होतील. छुप्या शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील. घरात तुमचा प्रभाव राहील.
धनू : आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी – व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराची बाजू समजून घ्या. कामे मनाजोगी पार पडतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल.
मकर : आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. गप्पांचा फड जमवाल. हटवादीपणा बाजूला सारावा. हातातील अधिकार वापरावेत. तुमची महत्वाकांक्षा वाढीस लागेल. सामाजिक वादात अडकू नका.
कुंभ : आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान – सन्मानात वाढ होईल. चंचलतेवर मात करावी. आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी. घरगुती गोष्टींत अधिक लक्ष घालाल. मनाजोगी खरेदी कराल. घराची सजावट काढली जाईल.
मीन : आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. मित्रमंडळींबरोबर फिरायला जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. (Today Rashi Bhavishya, 31 March 2023)