राशिभविष्य, शनिवार १४ मे २०२२ : आज चंद्र दिवस रात्र तूळ राशीत संचार करेल. आज सूर्य मेष राशीत भ्रमण करत वृषभ राशीत प्रवेश करेल.
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. प्रियजनांसाठी खर्च कराल.
मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. विरोधकांवर मात कराल.
सिंह : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. पत्रव्यवहार पार पडतील.
कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
तूळ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जुनी येणी वसूल होतील.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. पत्रव्यवहार पार पडतील.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.