राशिभविष्य, शनिवार २१ मे २०२२ : आज चंद्र शनीच्या मकर राशीत भ्रमण करेल. अशा स्थितीत सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक बाबतीत शुभ राहील हे नक्षत्रांच्या योगायोगावरून समजते.
मेष : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. व्यवसायात वाढ होईल.
वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : वादविवाद टाळावेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुरुकृपा लाभेल.
सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.
कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
वृश्चिक : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. गुरूकृपा लाभेल.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. सौख्य लाभेल.
मकर : तुमचा प्रभाव राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.