मेष : तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार लोकांचा आजचा दिवस आनंदी जाईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. बेरोजगार तरुणांना रोजगार मिण्याची शक्यता आहे. स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल. हुकुमशाहीपणा दूर सारावा.
वृषभ : तब्येतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आज उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल. नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल.
मिथुन : नव्या नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल. काही संमेलनांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. मानसिक त्रास वाढू शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आज वाढेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत.
कर्क : नोकरदार लोक दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. बोलण्यात गोडवा ठेवा, अन्यथा अडचणीत येऊ शकता. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. आधुनिक विचार आमलात आणून पहावेत. कामे संथगतीने पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नावलौकिकास पात्र व्हाल.
सिंह : कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. व्यवसायातील जास्त कामामुळं थोडा तणाव येऊ शकतो. सर्व कामे पूर्ण होतील. सासरच्या मंडळींकडूनही आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. उगाचच विवंचना लागून राहील. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. काही गोष्टी स्थिर होण्यास वेळ द्यावा.
कन्या : नोकरीत लाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगती दिसेल. पदातही वाढ होणार आहे. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. अत्यंत व्यवहारीपणे वागाल. मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल. नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. इतरांचा विश्वास संपादन करावा.
तूळ : तुमचे पदही वाढेल. उत्पन्नातही वाढ होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही जो व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात यश मिळेल. घरातील ज्येष्ठांचा आदर करावा. जवळचा प्रवास जपून करावा. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल. आळस बाजूला सारावा लागेल.
वृश्चिक : मित्रांचेही सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील. राजकीयदृष्ट्या यश मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. शांत व खोलवर विचार करावा. काही गोष्टींचे मनन करावे लागेल. चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत. अति महत्त्वाकांक्षा बाळगाल. भावंडांची काळजी लागून राहील.
धनू : एखादे काम पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक योजना फलदायी ठरतील. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम असाल. मित्रांच्या मदतीने तुमचे उत्पन्न वाढेल. चांगला आर्थिक लाभ होईल. चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल. स्वकष्टावर अधिक लक्ष द्याल. काटकसरीने वागणे ठेवाल. शक्यतो मोजकेच शब्द वापरावेत.
मकर : मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. संयम कमी होईल. चटकन निराश होणे टाळावे. परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे. स्त्रियांवरून वाद वाढू शकतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
कुंभ : सत्ताधारी प्रशासनाकडून मदत मिळेल.
नोकरीमध्ये तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकणे टाळावे लागेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. काही गुणांना उशिरा वाव मिळेल. मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. वेळेचे बंधन पाळावे.
मीन : धन, मान-सन्मान, कीर्ती यात वाढ होईल. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्न वाढेल. खर्चही वाढतील. परंतू, आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळं सर्व खर्च तुम्हीच कराल. कुटुंबात सुख-शांती नांदेल.कामाची दगदग जाणवेल. थोडा वेळ आपल्यासाठी देखील काढावा लागेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. कष्टाची योग्य किंमत जाणाल. सतत धडपड करत राहाल. (Today Rashi Bhavishya, 27 February 2023)