मेष : सार्वजनिक अथवा कोणत्याही ठिकाणी काम करताना नम्रता, संयम ठेवा. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. धंद्यात प्रगती, लाभ होईल. आपले मनोबल कमी असणार आहे. काहींना हितशत्रूचा त्रास जाणवेल. संसारात खर्च वाढेल. अनावश्यक वेळ वाया जाईल. व्यवसायात नवीन काही करण्याचे नियोजन सध्या करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्यावे. आर्थिक बचत करणे योग्य राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी कोणत्याही प्रकारचे गैरसमज टाळावे लागतील.
वृषभ : विरोधक गुप्त कारवाया करतील. तुमचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. मनोबल वाढणार आहे. सावध भूमिका घ्या. काहींना अचानक धनलाभ होईल. प्रवासातून फायदा होईल. नोकरी टिकवा. धंद्यात लाभ, अरेरावी नको. काही जण जुन्या आठवणीत रमणार आहेत. व्यवसायात धावपळ होईल, मात्र फायदा आहे तेवढाच होईल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, नाहीतर तुम्हाला फायद्यापेक्षा नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे.
मिथुन : सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. आपण आपल्या घरातील कामांना प्राधान्य देणार आहात. नोकरीत बढती, बदल शक्य. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता देणारी घटना घडेल. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळेल. स्वास्थ्य उत्तम लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करताना भान ठेवा. जमीन जुमल्याशी संबंधित वाद एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील.
कर्क : अडचणी सोडवा. नोकरीत उन्नती होईल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात जिद्दीने कार्यरत असणार आहात. धंद्यातील समस्या कमी होऊन योग्य भागीदार मिळेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रगतीची नवी वाट सापडेल. खरेदीविक्रीत लाभ होईल. उत्साही राहणार आहात. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदाराशी क्वचितच भेटू आणि बोलू शकाल. मैत्रीचे नाते दृढ होईल. नातेवाईकांशी जेवढा असेल तेवढा संपर्क ठेवा.
सिंह : प्रत्येक दिवस ऊर्जा आणि शक्ती देणारा ठरेल. आर्थिक कामांसाठी दिवस आपणाला अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवासात सावध रहा. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडणार आहे. नोकरीधंद्यात चांगली संधी मिळेल. तुमचा उत्साह व उमेद वाढेल. प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील नुकसान टळेल. नफा चांगला होईल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास अपेक्षित यश आणि नफा मिळवून देतील. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घराच्या सजावटीवर मोठा खर्च करू शकता.
कन्या : आत्मविश्वास वाढेल. उत्साह वाढेल. तुमचा उत्साह वाढणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता व मरगळ जाईल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करणार आहात. आनंदी व आशावादी मनाने कार्यरत राहणार आहात. या कठीण काळात तुमचा प्रेमी किंवा प्रेमिका किंवा जीवनसाथी सावलीप्रमाणे तुमच्या पाठीशी उभा राहील. आर्थिक सफलता मिळेल. राजकीय क्षेत्रात सध्या वेळ देता येणार नाही. प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा थोडा कमी फायदेशीर ठरेल, ज्यामुळे तुम्ही थोडे निराश असाल.
तुळ : कुणालाही कमी समजू नका. नोकरीत प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. धंद्यात चर्चा करताना सावध रहा. प्रवासात व वाहने चालविताना आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी. काहींना निरुत्साही वातावरणात काम करावी लागणार आहेत. करार नीट करा. शब्द जपून वापरा. आरोग्य जपावे. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. स्वत:वर नियंत्रण ठेवा. पौर्णिमा दिवस चांगला जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण या काळात तुम्हाला काही मोसमी किंवा जुना आजार होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : मैत्रीत, नात्यात गैरसमज, तणाव होतील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरीच्या कामात व्याप होतील. कामाचा ताण कमी असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. धंद्यातील गुंता वाढवू नका. संयमाने बोला. काहींना विविध लाभ होतील. आठवड्याच्या उत्तरार्धात करिअर किंवा व्यवसायाच्या निमित्ताने केलेला प्रवास शुभ आणि लाभदायक ठरेल. व्यवसायाशी संबंधित लोकांनी कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी त्यांच्या हितचिंतकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
धनु : महत्त्वाची, कठीण कामे सप्ताहाच्या पूर्वार्धात करा. सार्वजनिक क्षेत्रात आज तुम्ही उत्साहाने सहभागी होणार आहात. उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल. सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. काहींना मान-सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याची लोकप्रियता वाढेल. प्रसिद्धी मिळेल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही राहणार आहात. मित्र-मैत्रिणींशी करमणूक होईल. घरामध्ये नको त्या गोष्टींची चर्चा करू नका.
मकर : अहंकार नको. रागावर ताबा ठेवल्यास प्रतिमा उजळेल. नैराश्य कमी होईल. आपल्याला अनेक कामासाठी अनुकूलता लाभणार आहे. नोकरीत प्रभाव राहील. कामाचे कौतुक होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. चर्चेत यश मिळेल. योग्य मुद्दे तयार कराल. दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. आर्थिक चिंता मिटेल. आठवड्याच्या पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग थोडा आरामदायी असणार आहे. या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळतील.
कुंभ : प्रवासात, वाहन चालवताना धोका पत्करू नका. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. वाद वाढवू नका. नोकरीत प्रशंसनीय काम कराल. महत्त्वाची कामे शक्यतो नकोत. बढती, बदली होईल. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. आपल्याला काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांना नवीन प्रकल्प किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळेल, परंतु असे करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या. समोरच्याने एखादा सल्ला दिला तर तो ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका.
मीन : रागावर ताबा ठेवला तर महत्त्व वाढेल. प्रवासातून आनंद मिळेल. आज तुम्ही विशेष उत्साही असणार आहात. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही स्वतःला प्राधान्य देणार आहात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगाने पुढे जाल. वैवाहिक सौख्य लाभेल. लोकप्रियतेत वाढ होईल. आर्थिकदृष्टया व्यवहार फसणार नाहीत याची काळजी घ्या. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. आठवड्याच्या उत्तरार्धात सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांना काही मोठी जबाबदारी मिळू शकते. कौटुंबिक जीवनासाठीही हा काळ अनुकूल राहील.
















